कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात विनावरवाना वृक्ष तोड
नवी मुंबई-:कोपरखैरणे सेक्टर १९ या भागात एका मोकळ्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्ष तोड केल्याचे दिसून येत आहे. सदर वृक्ष तोड ही शनिवार रविवार अशा सुट्टीच्या दिवशी करण्यात आली असून तोडलेले वृक्ष त्याच ठिकाणी जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर वृक्षतोडी विरोधात मनपा उद्यान विभाग काय कारवाई करते याकडे पर्यावरण प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
देशात राहण्याजोगे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला नामांकन मिळाले आहे.त्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असून घरांची मागणी वाढत आहे.आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी विकासकांनी घर बांधणी वरभर दिला आहे. मक्तर ही घरे बांधत असताना विकासकांकडुन शहरारील पर्यावरणावर घाव घालण्याचे सत्र सुरूच ठेवले अहव.नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्ष तोड केली जात आहे.मात्र विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले असून देखील उद्यान विभागाकडून कारवाई होत नसल्याने अशी वृक्ष तोड सुरूच आहे.कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये नुकतीच शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्ष तोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.आणि सदर वृक्ष तोड केल्यानंतर वृक्षांच्या फांद्या त्याच ठिकाणी जाळून पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे. याबाबत विनापरवानगी वृक्ष तोड केल्याप्रकरणी पर्यावरण प्रेमींनी उद्यान विभागाला कल्पना देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे उद्यान विभाग आता काय कारवाई करते याकडे पर्यावरण प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.