नेरूळ काँग्रेसने महागाईची गुढी उभारत केला इंधन दरवाढीचा निषेध

नवी मुंबई : सातत्याने होणारी पेट्रोल, डिझेल व गॅस तसेच अन्य इंधनात होणारी दरवाढ, यातून महागाईला मिळणारे खतपाणी, परिणामी महागाईत भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिनी  नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर दोन येथील चौकात दरवाढीच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन करण्यात आले. महागाईची गुढी उभारत कामगार नेते व नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी गॅसला हार घातला.

गुढीपाडव्याच्या दिनी महागाईची गुढी उभारत इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आला. बराच वेळ घोषणाबाजी झाल्यावर गॅसला हार घालत वाढत्या दरवाढीचा रविंद्र सावंत व त्यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलाच्या आवाजात निषेध केला. कामगार नेते रविंद्र सावंत हे स्वत: चौकात बराच वेळ महागाईच्या निषेधार्थ ढोल वाजवित जनजागृती करताना पहावयास मिळाले.

या आंदोलनात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासमवेत नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विजय कुरकुटे, विद्या भांडेकर,  वॉर्ड अध्यक्ष राहूल कापडणे, सुधीर पांचाळ, तळेकर गुरूजी, बाळा गावडे, संध्या कोकाटे, मनीष महापुरे, दिघे, सारीका धोंडे, पिसाळ, पिंटो अंकल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी सहभागी झाले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उलवे येथील भूखंड तिरुपती देवस्थानाला देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार