एकविरा देवीच्या पालखीचे नेरुळ येथे राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी तर्फे स्वागत

नवी मुंबई : दिवाळी नंतर बळीराजाला सुगीचे दिवस येतात आणि येथूनच सर्वत्र देवी - देवतांच्या पायी पालखी, वाऱ्यांना सुरुवात होते. अशीच एक वारी धारावी कोळीवाड्यातून  कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनास निघाली असून काल या पालखीचे नवी मुंबईत नेरुळ येथे आगमन झाले असता या पालखीचे नवी मुंबईत नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदूदादा पाटील यांच्या उपस्थितीत  मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी एकविरा मातेचे मनोभावे दर्शन घेतले व देवी भक्तांचे जंगी स्वागत केले. यावेळी वारीतील सर्व देवी भक्तांना अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी पालखीतील देवी भक्तांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ही पालखी रात्री पनवेल मुक्कामी पोहचणार असून राष्ट्रवादी मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश कोळी, पनवेल राष्ट्रवादी महिला मच्छीमार सेलचे अध्यक्ष अरुण परदेशी, पनवेल शहर अध्यक्ष रामा भगत, पनवेल शहर सचिव गजानन शेलार, पेण तालुकाध्यक्ष बिपिन पाटील तसेच राष्ट्रवादी मच्छिमार सेलचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने पनवेल मुक्कामीही या पालखीचे जंगी स्वागत करण्यात येणार असून पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  सोहळ्यातील सर्व भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणे काळाची गरज - आमदार मंदाताई म्हात्रे