पनवेल पालिकेत २३ गृप ग्रामपंचायतील 320 कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय

उरण : म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष  संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव, मुख्य संघटक अनंत पाटील आणि युनियन चे सर्व सहकारी पदाधिकारी आणि सदस्य यांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे . सन २०१६ साली पनवेल महानगर पालिकेत अनेक ग्राम पंचायतींचा समावेश करण्यात आले.परंतु ते कर्मचारी कायम करण्यास तत्कालीन महानगर पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी कामगारांना कायम करण्यास विराेध दर्शविला हाेता. सर्व कामगारांना ठेकेदारा मार्फत वेतन घेण्यासाठी दबाव आणला जात होता. परंतु कामगार नेते अ़ॅड. सुरेश ठाकूर यांनी योग्य प्रकारे प्लॅनिंग केले . कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरची लढाई असे दोन्ही मार्ग अवलंबले.

मुंबई येथे मंत्रालयावर जवळ जवळ दहा हजार लोकांचा पायी मोर्चा काढला आणि प्रशासनाला दणका दिल्यावर जाग आली.  पहिल्या टप्प्यात १०५ + १८३ कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात आता शवटचे ३२ कर्मचारी असे एकूण ३२० कर्मचारी कायम करण्यात यशस्वी झाले. या सर्व प्रक्रिये मध्ये मंत्रालयीन पातळीवरील तसेच एकी टिकण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि युनियनचे सरचिटणीस संतोष पवार आणि कार्याध्यक्ष अनिल जाधव, अनंत पाटील, सुधाकर पाटील, प्रा. राजेंद्र मढवी , युनियन चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी त्यांना सदैव साथ दिली. यामध्ये वेळोवेळी यथायोग्य मार्गदर्शन सध्याचे पालिका आयुक्त  गणेश देशमुख यांनी देखील केले आहे. उशिरा का होईना पण योग्य निर्णय मा. महाराष्ट्र शासनाने घेतल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि महानगर पालिका प्रशासनाचे मुनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी जाहीर आभार मानले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकविरा देवीच्या पालखीचे नेरुळ येथे राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी तर्फे स्वागत