दिव्यांगाना 10 नोव्हेंबर रोजी सोडत पध्दतीने स्टॉल्सचे वितरण 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकाच्या वतीने शहरातील दिव्यागांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून पात्र दिव्यांग अर्जदारांची अंतिम यादी 4 नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता विष्णूदास भावे नाटÎगृह येथे अंतिम यादीतील पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तीना सोडत (लॉटरी) पध्दतीने स्टॉल्सचे वितरण करण्यात येणार आहे.  

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिव्यागांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी 11 फेब्रुवारी आणि 6 जून 2019 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर 714 अर्ज महापालिकेकडे प्राफ्त झाले होते. सदर अर्जांच्या छाननीनंतर वैध ठरलेल्या 31 अर्जांना 20 डिसेंबर 2019 रोजीच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. मागील तीन वर्षे दिव्यांगाची प्रतिक्षा यादी प्रलंबित होती. हि प्रतिक्षा यादी अंतिम करण्यासाठी 27 जुन ते 12 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.  

दरम्यान, सदर हरकती व सूचनानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालय तसेच वेबसाईटवर 4 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता विष्णूदास भावे नाटÎगृह येथे सोडतीद्वारे स्टॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे. सोडतीच्यावेळी अर्जदाराने आपली ओळख पटविण्याकरिता आधार कार्ड किंवा पॅनकार्ड आणणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक असल्यास अर्जदारासोबत एकाच व्यक्तीला सोडतीसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी बस स्थानकातील वाणिज्य संकुल बांधकामाची आयुवतांकडून पाहणी