माजी आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत

उरण : गुरुवार दिनाकं 03 नोव्हेंबर 2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे(शिवसेना )पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील भाजपच्या माजी उपसभापती मधुमती मनोहर गुरव व रेखा ज्ञानेश्वर अपटेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.तसेच त्यांच्यासोबत तुपगावं,अली अंबिवली व मोहपाडा विभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य  मोतीराम ठोंबरे, उपतालुकाप्रमुख  रमेश पाटील,  मनोहर देशमुख,माजी सरपंच महेश परीट,ग्रामपंचायत सदस्या  रोहिणी विलास गुरव, सपना मनोज गुरव, स्वाती प्रकाश जाधव,  संतोष पागत, अजीत भोईर,  प्रकाश जाधव,  ओंकार गुरव, दिलीप साळुंखे, मंदा गुरव, नम्रता गुरव,पूनम गुरव,  वृषाली गुरव व  सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पीएम स्वनिधी प्रक्रियेला गती द्या