विकास आराखडामध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये हवी ई-चार्जिंग स्टेशन

नवी मुंबई ः नवी मुंबई विकास आराखडा २०१८-२०३८ च्या मसुद्यावर महापालिका प्रशासनाकडून सूचना-हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याला ‘टीम आप नवी मुंबई'कडून सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

एकविसाव्या शतकातील एक आधुनिक शहर म्हणून ओळख आणि स्वच्छ शहर म्हणून सतत राष्ट्रीय स्तरावर नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबई शहराचा प्रत्येक नवी मुंबईकराला अभिमानच आहे. महापालिके तर्फे आरएफआयडी टॅगचा वापर करुन घंटागाडीच्या कचरापेट्या व्यवस्थापन, वाहनांची नम्बर प्लेट ओळखणारे सीसीटिव्ही कॅमेरे, ई-टॉयलेटस्‌, कचरा रिसायकलिंग, सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस आदि नाविन्यपूर्ण हायटेक प्रकल्प राबविल्या जात आहेतच.

आजच्या घडीला जगभरात पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या खाजगी वाहनांना, पर्यावरणपूर्वक आणी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असा इलेवट्रीक खाजगी वाहनांचा पर्याय झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यापुढील काळात पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे महत्व नक्कीच कमी होणार आहे. पण, आज आपल्या देशात ई-चार्जिंगची व्यवस्था तितकीशी सहज उपलब्ध नाही. त्यामुळे नवी मुंबईतील बरेचशे नागरिक इच्छा असून सुध्दा इलेवट्रीक खाजगी वाहन घेण्यास कचरत आहेत. त्यामुळे पर्यावरण समतोल राखणारे आधुनिक शहर असे बिरुद मिळविणाऱ्या आपल्या नवी मुंबईसाठी महापालिकेने पुढाकार घेऊन, नवी मुंबईच्या प्रत्येक सेक्टर मध्ये छोटेखानी काही प्रमाणात सोलर तंत्रज्ञानाचा वापर करुन ई-चार्जिंग स्टेशन साठी जागेची तरतूद करून ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मोबाईल ॲप द्वारा वेळ बुकीगची व्यवस्था करावी.

या प्रकल्पामधून महापालिकेला उत्पन्न तर होईलच शिवाय नवीन रोजगार निर्मिती देखील होईल. त्यासाठी टाटा मोटर्स सारख्या खाजगी उद्योगांशी करार सुध्दा करता येईल. त्यामुळे नवी मुंबईतील प्रत्येक सेक्टर मध्ये ई-चार्जिंग स्टेशन साठी जागेची तरतूद विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात यावी. सदर योजना द्वारे आपल्या नवी मुंबई शहराला संपूर्ण देशातील पहिले ई-चार्जिंग शहर म्हणून नावलौकिक मिळवून द्यावा, अशी मागणी ‘आप'च्या वतीने नवी मुंबई शहर अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

४१९ हरकतींबाबत महापालिका उद्यान विभागाला कोडे