घाऊक बाजारात कांदा ३५ रुपयांवर

कांदा दरवाढीने सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा मार्केट मध्ये मागील ४-५ दिवसांपासून कांदा दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात कांदा दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली होती. ३१ ऑवटोबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो ३५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांमध्ये कांदा दरात प्रतिकिलो १० ते १२ रुपयांनी वाढ झाली असून, येत्या महिन्याभरात कांद्याचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना विशेषतः गृहिणींना कांदा रडवणार आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती कांदा-बटाटा बाजारात मागील एक आठवड्यापासून कांद्याची दरवाढ सुरु झाली आहे. मागील महिन्यात राज्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात पडला. त्यामुळे साठवणुकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतिचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत असून, हलक्या प्रतीचा कांदा अधिक दाखल होत आहे. मात्र, घाऊक एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. कांद्याचा पुरवठा कमी असल्याने उच्च प्रतीच्या कांद्याची दरवाढ होत आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा २० % तर हलक्या प्रतीचा कांदा ८० % दाखल होत आहे. एक नंबर असलेल्या कांद्याची ३१ ऑवटोबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने तर हलक्या प्रतीच्या कांद्याची २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. ३१ ऑवटोबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात १५२ गाडी कांदा आवक होऊन देखील कांदा दरात ५ रुपयांची वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात २७ ऑवटोबर पर्यंत कांदा २५ रुपयांवर होता. परंतु, त्यानंतर कांदा दरवाढीला रोज सुरुवात झाली. २७ ऑवटोबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात कांदा २५ ते २७ रुपये प्रतिकिलो तर २९ ऑवटोबर रोजी २५ ते ३१ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री झाला. मात्र, ३१ ऑवटोबर रोजी पुन्हा रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार उघडताच कांद्याने ३५ रुपये प्रतिकिलो दर गाठला आहे. येत्या महिन्याभरात कांदा चाळीशीपार करणार असल्याची शक्यता रोजी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत असून, किरकोळ बाजारातही कादा पन्नाशीवर जाणार असल्याची शवयता एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यवत केली आहे.

मागील तीन-चार महिने कांदा दराच्या तुलनेत बटाटा वरचढ ठरत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बटाट्यापेक्षाही कांदा दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्याभरापासून स्थिर असलेले बटाटा दर चालू आठवड्यात कांद्याच्या पाठोपाठ वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात जुना बटाटा मोठ्या प्रमाणावर असून, एक ते दोन गाड्या नवीन बटाटा आवक होत आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सातारा आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची आवक सध्या होत आहे. या नवीन बटाट्याला अधिक मागणी असल्याने २५ रुपये दराने नवीन बटाटा विकला जात आहे, अशी माहिती एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे जुना बटाटा चवीला गोड लागत असल्याने त्याची मागणी दिवसेंदिवस रोडावत आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या बटाट्याची मागणी वाढल्याने दर वाढत आहेत. एक आठवड्यापूर्वी १८ ते २२ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा बटाटा आता २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने तर वेफर्स बनविण्यासाठी लागणारा उच्च प्रतीचा बटाटा २९ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'ची आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा २ नोव्हेंबर पासून