सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना नमुंमपामार्फत अभिवादन

नवी मुंबई ः थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आणि माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्पीथिएटरमध्ये महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन या महामानवांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ-१चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकान, उपायुक्त अनंत जाधव, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिक्षणाधिकारी अरुणा यादव आणि इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने आणि कार्याने साध्य झालेल्या राष्ट्रीय ऐक्यासाठी शपथ घेत असल्याचे घोषित करीत माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा जतन करण्यासाठी योगदान देण्याचा गांभीर्यपूर्वक निश्चय करित असल्याची सामुहिक शपथ ग्रहण केली. त्याचप्रमाणे यावेळी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत शासनाने घोषित केलेल्या दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिक व विद्यार्थ्यांनी नवी मुंबईत विविध ठिकाणी एकता दौडच्या माध्यमातून दिला एकात्मतेचा संदेश