लोकांना एकतेचा संदेश देण्यासाठी सिआरपीएफ आणि रॅपिड अँक्शन फोर्सच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोजा येथे सायकल रॅली

नवी मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लोकांना एकतेचा संदेश देण्यासाठी तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस दल आणि 102 रॅपिड अँक्शन फोर्सच्या (द्रुकाब) वतीने 29 ऑक्टोबर रोजी 12 किमी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या 12 किमी सायकल रॅलीचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता, पश्चिम सेक्टरच्या कावा प्रमुख रितु दत्ता यांनी नेतृत्व करत जवान आणि नागरिकांना प्रेरित केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतेचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस दल आणि 102 रॅपिड अँक्शन फोर्सच्या (द्रुकाब) वतीन 29 ऑक्टोबर रोजी 12 किमी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान पश्चिम सेक्टरचे पोलीस उप महानिरीक्षक चंद्र भूषण, पीएमजी, पोलीस उप महानिरींक्षक पी.सी.झा,  यांच्यासह पश्चिम सेक्टर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि 102 रॅपिड अँक्शन फोर्सचे (द्रुकाब)  अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘घर हवक संघर्ष समिती'ची महापालिकेवर धडक