कांदा बटाटा बाजारात मागील तीन चार दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात

एपीएमसी बाजारात कांद्याची दर वाढ सुरूच

नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा बटाटा बाजारात मागील तीन चार दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून एकाच आठवड्यात कांद्याच्या दरात  ६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी  २० ते २५ रू किलोने विकला जाणारा कांदा शनिवारी घाऊक बाजारात २५ ते ३१ रू प्रतिकिलो विकला गेला तर किरकोळ बाजारात कांदा ४० ते ४५ रू विकला जात आहे..

वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा.बटाटा घाऊक बाजारात कांदा वाढीचे सत्र सुरु असून मागील तीन दिवसांपासून दरात वाढ होताना दिसत आहे.मागील काही दिवस राज्यात परतीचा पाउस झाला.

त्यामुळे साठवुकीचा कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून त्याचबरोबर नवीन लाल कांद्याच्या उत्पादनाला ही फटका बसला आहे. त्यामुळे कांदा महागला आहे.तर दिवाळी निमित्ताने सुट्टीत कांदा काढणीसाठी आणि शेतमाल भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने गुरुवारी आवक घटून ४५ गाडी झाली होती. बाजारात कांद्याची आवक घटल्याने मागणीत ही वाढ झाल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली असून ही दरवाढ कायम आहे. मागील आठवड्यात २० ते  २५ रुपयांवर कांदा स्थिर होता. मात्र गुरुवार पासून कांद्याच्या दरात वाढ होत चालली आहे. शनिवारी घाऊक बाजारात २५ ते ३१ रू प्रतिकिलो विकला गेला तर किरकोळ बाजारात कांदा ४० ते ४५ रू विकला जात आहे .तर शनिवारी ११४ गाड्या आवक झाली असून ही दरवाढ अशीच काही दिवस राहण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकांना एकतेचा संदेश देण्यासाठी सिआरपीएफ आणि रॅपिड अँक्शन फोर्सच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन