बाजार समितीच्या पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
एपीएमसीचा पुनर्विकास बाजार घटकांच्या समंतींनेच
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती धोकादायक झाल्या आहेत.आणि या इमारतींचा आगामी काळात पुनर्विकास होणार आहे.मात्र बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्याने बांधा आणि वापरा तत्वावर(बी ओ टी ) हा पुनर्विकास होणार असून त्याकरिता एपीएमसी संचालक मंडळाने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सन १९८२ मध्ये कांदा बटाटा बाजार इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असल्याने त्याचे काम अल्पावधीतच निकृष्ट ठरू लागले आणि २००५ पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट झाले. त्यामुळे सदर इमारतीच्या पुनर्विकासाचा पर्याय समोर आला. मात्र प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. एपीएमसी प्रशासनाकडे पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक ऐपत नसल्याने खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधा आणि वापरा तत्वावर पुनर्बांधणी करण्याची चर्चा आहे. याला आता अंतिम स्वरूप येताना दिसत आहे. कारण बाजार समितीचा पुनर्विकास करण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने आता सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्या मार्फत बाजार घटकांसमोर पुनर्विकासाचे सादरीकरण केले जाईल आणि बाजार घटकांच्या समंतीनंतरच यापुनर्विकास कामाला अंतिम मंजुरी देण्यात येईल आणि त्याचवेळी त्याला मोबदला दिला जाणार आहे अशा अटी शर्थिंवर अत्यंत पारदर्शी पद्धतीने हे काम केले जात आहे. सल्लागारामुळे बाजाराची आधुनिक पद्धतीची बांधणी केली जाईल अशा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला असून कांदा बटाटा बाजार अवारासो बत इतर चार बाजार आवारांच्या पुनर्विकासाचे सादरी करण केले जाणार असल्याने एपीएमसी बाजार समितीतील पुनर्विकास लवकरच आकार घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
कांदा बटाटा बाजार समितीसह इतर बाजार समिती, मध्यवर्ती सुविधा इमारतीचा पुनर्विकास कामासाठी पाच सल्लागार कंपन्यांनी इच्छा दाखवली होती. त्यातील एका कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णय.संचालक मंडळाने घेतला असून बाजार घटकांनी सादरी करणाला मंजुरी दिल्या नंतरच पैसे अदा केले जातील.या अटी शर्थीवरच सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.- नीलेश वीरा, संचालक, एपीएमसी बाजार समिती