‘सिडको'च्या ७,८४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनेचा शुभारंभ

‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजनेचा शुभारंभ ; १९ जानेवारी २०२३ रोजी संगणकीय सोडत

नवी मुंबई ः ‘सिडको'तर्फे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर२४ ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या ७,८४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केली. ‘सिडको'च्या सदर महागृहनिर्माण योजना अंतर्गत उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व पी ३ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील ७,८४९ घरे (सदनिका) उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस २५ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. विविध आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करुन देण्यामध्ये सिडको महामंडळ संपूर्ण देशात अग्रेसर आहे. ‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजनेद्वारे पुन्हा एकदा हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले.  

‘सिडको'तर्फे आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातली घरे उपलब्ध करून देण्यात येतात. ‘सिडको'ने नवी मुंबई क्षेत्रात आजवर सुमारे दीड लाखांहून अधिक घरे बांधून लक्षावधी कुटुबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. या वर्षीच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘सिडको'ने ७,८४९ सदनिकांची महागृहनिर्माण योजना आणली आहे. परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित या योजनेंतर्गत उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व २ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व पी३ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता ७,८४९ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होणारा उलवे नोड परिवहन सुविधांनीही समृध्द आहे. महागृहनिर्माण योजनेतील गृहसंकुलांना नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) द्वारेही उलवे नोडला कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. ‘सिडको'तर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे नोडपासून नजिकच्या अंतरावर आहे. गृहसंकुलांचा परिसर शाळा, महाविद्यालये, रुग्णालय आदि मूलभूत सुविधांनी परिपूर्ण आहे.

महागृहनिर्माण योजनेतील सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन पध्दतीने पार पडणार आहेत. योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस २५ ऑक्टोबर सुरुवात झाली आहे. योजनेची संगणकीय सोडत १९ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा याकरिता प्ूूज्ेः//त्दूूाीब्.म्ग्‌म्दग्ह्‌ग्ी.म्दस् असे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

‘सिडको'च्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात उलवे नोडला मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त होणार आहे. ‘सिडको'ने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणलेल्या महागृहनिर्माण योजनेद्वारे परिवहनदृष्ट्या समृध्द असणाऱ्या उलवे नोडमध्ये घर घ्ोण्याची संधी प्राप्त झाली आहे.
-डॉ.संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाजार समितीच्या पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती