तांत्रिक अडचणी मुळे आनंदाची दिवाळी ऐवजी  नाराजीची दिवाळी

नवी मुंबई -: सर्व सामान्य  लाभार्थी कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी करावी  म्हणून राज्य शासनामार्फत १०० रू. मध्ये चार शिधा जिन्नसचे आनंदाची दिवाळी संच वाटप करण्यात आहेत. मात्र सदर वस्तू वितरणात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने रविवार दुपार पर्यंत सदर वस्तूंचा लाभ लाभार्थी कुटुंबांना भेटला  नसल्याने  रेशन दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या.

यंदा दिवाळी सणानिमित्त राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून सवलतीच्या दरात अतिरिक्त महत्त्वाचे दिवाळी शिधाजिन्नस (दिवाळी पॅकेज) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई शहरातही शुक्रवार पासून  या वस्तू वितरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्यात बेलापूर येथून सुरुवात झाली. वाशी शिधावाटप कार्यालय अंतर्गत नवी मुंबईतील ४८२७६ लाभार्थ्यांना  याचा लाभ मिळणार आहे.दिवाळीच्या निमित्तानं आवश्यक रवा,साखर,चणाडाळ व पामतेल अशा  चार महत्त्वाच्या जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा  सरकारनं घेतला आहे. शुक्रवार दि. २१ऑक्टोबर पासून दिवाळी शिधा वितरण करण्यास सुरुवात केली . मात्र शहरातील बहुतांश.दुकानात शुक्रवार सायंकाळ पर्यंत या वस्तूंचे वितरण झाले नव्हते.तर या चार वस्तू पैकी रवा व चनाडाळ उपलब्ध नसल्याने अपुऱ्या वस्तूचे.वाटप करण्यात आले होते.तर आता सदर वस्तू वाटपात  तांत्रिक अडचणी येत आहेत. रेशन दुकानात कधी पॉस  मशीन बंद , तर कधी इंटरनेट सेवा बंद ,तर काही  लाभार्थी व्यक्तीचे हाताचे ठसे जुळत नाही. त्यामुळे अशा अनेक तांत्रिक अडचणी मुळे लाभार्थी कुटुंबांना रविवार दुपार पर्यंत शिधा वस्तू मिळाल्या नव्हत्या.त्यामुळे   शिधा वस्तू वाटपाला विलंब झाल्याने अनेक लाभार्थी कुटुंबांची आनंदाची दिवाळी साजरी होण्याऐवजी नाराजीची दिवाळी झाली.

रेशन दुकादारांची मनमानी

लाभार्थी कुटुंबाची आनंदाची दिवाळी अंतर्गत शासनाने अवघ्या १०० रुपयांत रेशनवर  चार वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.आणि सदर वस्तू वाटपात काही तांत्रिक अडचणी येत असतील तर जे लाभार्थी कुटुंबांची गैरसोय होऊ नये म्हणून  त्यांना ऑफलाईन वस्तू वाटप कराव्या अशा सूचना  शिधा वाटप अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.मात्र सदर सूचना देऊन देखील रेशन दुकानदार पॉस मशीन वरच अडून बसल्याने अनेक नागरिकांचा खोळंबा झाला तर मशीन इंटरनेट बंद असल्याचे कारण देत कोपरी गाव येथील रेशन दुकान क्रमांक ४१ फ १८१ चक्क बंद ठेवण्यात आले होत.त्यामुळे नागरिक बाहेर ताटकळत उभे होते. याबाबत शिधा वाटप अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर दुकान उघडण्यात आले.

नवी मुंबई शहरात  शुक्रवार पासून  शिधा जिन्नस वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे सदर वस्तू वाटपात काही तांत्रिक अडचणी येत असतील तर जे लाभार्थी कुटुंबांची गैरसोय होऊ नये म्हणून  त्यांना ऑफलाईन वस्तू वाटप कराव्या अशा सूचना रेशन दुकानदाराना देण्यात  आल्या आहेत.- सुजित जगताप, सहाय्यक शिधा वाटप अधिकारी,४१ फ उप,वाशी कार्यालय

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारताच्या विजयाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी