भारताच्या विजयाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी

नवी मुंबई -:एखादा सामना असला की विजेत्या खेळाडूंना बक्षीस दिले जाते. मात्र कोपरी गावात समाजसेवक परशुराम ठाकूर व केशव ठाकूर यांनी भारत पाकिस्तान सामना वेळ प्रेक्षकांसाठी बक्षिसांची खैरात ठेवली होती. शनिवारपासून टी ट्वेण्टी विश्वचषकाला सुरुवात झाली आणि रविवारी पारंपरिक प्रतिद्वंवी भारत पाकिस्तान असा सामना होता आणि या सामन्याचे थेट प्रक्षेपण ठाकुर यांनी मोठ्या पडद्यावर ठेवून उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे ठेवली होती. सदर सामना भारताने जिंकल्याने नागरिकांनी दिवाळी पूर्व संध्येलाच दिवाळी साजरी केली.

शनिवार पासून टी ट्वेण्टी विश्वचषकाला सुरुवात झालीआणि भारत देशातील क्रिकेट प्रेम हे जगजाहीर आहे आणि त्यात भारत पाकिस्तान सामना म्हंटले की त्याला युद्धाचे स्वरूप येते. नवी मुंबईत देखील या सामन्याची उस्तुकता शिगेला पोहोचलेली होती. त्यात नवी मुंबईत एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने सध्या लक्ष वेधून घेतले आहे. कोपरी गावातील समाजसेवक परशुराम ठाकूर व केशव ठाकूर यांनी यंदाच्या टी-ट्वेण्टी विश्वचषकातील भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामान्याचे चक्क मोठ्या पडद्यावर सार्वजनिक रित्या आयोजन केले आहे. मुख्य म्हणजे नुसते आयोजन करून ठाकूर  सामन्या नंतर लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. असून त्यातून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.यात प्रथम क्रमांक एअर कुलर, द्वितीय व तृतीय क्रमांक स्मार्ट वॉच, चौथ्या व पाचव्या क्रमांकास गॉगल देण्यात आली. अतिशय उत्कंठा वाढलेला हा सामना भारताने जिंकला आणि एकच जल्लोष झाला. त्यामुळे येथील नागरिकांनी दिवाळी पूर्व संध्येलाच दिवाळी साजरी केली. मात्र ठाकुर बंधूंनी राबवलेल्या या  उपक्रमाचे नवी मुंबईत सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली