सेवा पंधरवडा कर्तव्यपथ उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाची लक्षणीय कामगिरी

नवी मुंबई : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ या उपक्रमांतर्गत राज्यात समाज कल्याण विभागाने विविध प्रकारचे 6 हजारापेक्षा अधिक कार्यक्रम व उपक्रम राबवुन तब्बल 5 लाखांहून अधिक जनतेशी थेट संवाद साधला आहे. तसेच त्यातील 3 लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील विभागाने दिला आहे. त्यामुळे सेवा पंधरवडा कर्तव्य पथ उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाची कामगिरी लक्षणीय ठरली आहे.    

शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसाच्या कालावधीत राज्याच्या समाज कल्याण विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत राज्यात 519 ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र जनजागृती शिबिर भरविण्यात आले होते. यात 17282 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच 17 हजार विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी 45 ठिकाणी शिबिरे भरविण्यात आली. त्यातून 464 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले.  

तसेच 311 ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यातून 19681 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी राज्यात 314 ठिकाणी शिबिर भरविण्यात आले होते, त्यातून 91824  जणांना वैश्विक ओळखपत्र वाटप करण्यात आले. त्याशिवाय राज्यातील 16848 ऊसतोड कामगारांना देखील ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा या ठिकाणी 1707 विविध कार्यक्रमांचे-स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 84080 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी 385 वसतिगृहात जाऊन 31410 विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  

राज्यातील विविध महाविद्यालय 2776 समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यातील 36173 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती भरण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये 173654 विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. स्टँड अप योजनेतील 21 नव उद्योजकांचे प्रस्ताव प्राफ्त करुन घेण्यात आले, त्याचप्रमाणे राज्यात 224 ठिकाणी नशा मुक्त अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत 189 कर्मचाऱयांचे प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत. तसेच राज्यातील 14553 प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  

त्याचप्रमाणे विविध कार्यालयातील 10 हजाराहून अधिक अभिलेखे अद्यावत करण्यात आले. 372 कर्मचाऱयांना स्थायित्व प्रमाणपत्र देखील या कालावधीत देण्यात आले आहे. तर बाराशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱयांचे गोपनीय अहवाल अध्यायावत करण्यात आले. सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत राज्यातील समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्यामुळे राज्यात राबविलेले विविध उपक्रम यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राज्यात समाज कल्याण विभागाची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.  

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळी साहित्य  प्रदर्शन विक्री केंद्रातून महिलांना आर्थिक पाठबळ