डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्याधुनिक बाय-प्लेन  कॅथलॅब

  नवी मुंबई ः नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात बाय-प्लेन दर्जाची कॅथलॅब स्थापन करण्यात आली आहे. या कॅथलॅबचे उद्‌घाटन केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांच्या हस्ते २० ऑवटोबर रोजी संपन्न झाले. डॉ. डी. वाय. पाटील समुह आणि विद्यापीठचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार नवी मुंबईत अशा दर्जाचे सदर पहिली कॅथलॅब असून येथे सर्वोत्तम दर्जाचे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीची सुविधा मिळणार आहे. आयजीएस-६-ऑटोराईट ॲडव्हान्स बाय-प्लेन कॅथलॅब दक्षिण आशियातील सर्वोत्तम सुविधांपैकी एक आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांनी अशा अत्याधुनिक उपकरणाची सुविधा सामान्यांना परवडणाऱ्या दरात नवी मुंबईत उपलब्ध करुन दिल्याबद्दल डी. वाय. पाटील समूह आणि डॉ. विजय पाटील यांचे अभिनंदन केले. शिवाय डी. वाय. पाटील समुहातर्फे दिली जाणारी रुग्णसेवा राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच ना. मनसुख मंडावीया यांनी भारताचे वैश्विक स्तरातील आरोग्याच्या योगदानाबद्दल आणि विशेषतः कोव्हीड महामारीच्या दरम्यान भारतातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञRनी कोव्हीड उपचारासाठी आणि व्हॅक्सिनच्या निर्मितीद्वारे केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे अभिनंदन करतानाच संस्कृती मूल्य जोपासतच राष्ट्राची प्रगती शक्य असल्याचे आणि राष्ट्र विकसित करण्यासाठी संस्कृती आणि सभ्यता अशी नितीमत्ते जोपासत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत असल्याचे नमूद केले.

यावेळी बोलताना डॉ. विजय पाटील यांनी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा यांच्या प्रगतीतूनच देश समृध्द होऊ शकतो यावर ठाम विश्वास असल्याचे नमूद केले. रुग्णालयात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेली कॅथ लॅब दक्षिण आशियातील प्रथम दर्जाची असून डी. वाय. पाटील समूह तर्फे लोक आणि राष्ट्रसेवेसाठी करण्यात येणारे एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे जी कुठली जबाबदारी दिली जाईल ती आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसाठी सर्वतोपरे पार पाडण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचेही डॉ. विजय पाटील म्हणाले.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तर्फे पुरवली जाणारी आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने उपलब्ध होणारी आणि परवडणारी असल्याने त्याद्वारे लाखो रुग्णांना मदत होत आहे. शिवाय सदर नवीन मशीन द्वारे हृदय विकाराच्या अतिशय कठीण असलेल्या हृदय रोग असणाऱ्या रुग्णांना सुध्दा जगातील सर्वोत्तम दर्जाची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणे सहजतेने उपलब्ध झाल्याचे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील समहातील सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेवा पंधरवडा कर्तव्यपथ उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाची लक्षणीय कामगिरी