भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याची कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी

नवी मुंबई :- भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने दिवाळी बोनस वाटप करावा या मागणीसाठी गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सिबिडी येथील कोकण रेल्वे मुख्यालय् आवरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ३०० पेक्षा कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. कोकण रेल्वे कर्मचारी संघटना भारतीय रेल सेना तसेच अन्य सर्व संघटनानी एकत्रित आंदोलन करून बोनसची मागणी केली. सुमारे ७८ दिवसाच्या पगाराईतका बोनस देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात ३०० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. हल्ला बोल मोर्चा स्वरूपात आंदोलन केले.या वेळी मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करून चक्का जाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्ले-वेस्ट सेग्रीगेशन गेमद्वारे मुलांवर कचरा वर्गीकरणाचे हसत खेळत संस्कार