१६०० हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरीत करण्यात ‘सिडको'कडून चालढकल

नवी मुंबई ः राज्य शासनाचे महामंडळ असणारी सिडको १,६८० हेक्टर खारफुटीचे क्षेत्र वन विभागाला हस्तांतरीत करण्यात चालढकल करत आहे. एकट्या पनवेल तालुक्यात येणाऱ्या खारफुटीच्या जमिनीचे क्षेत्रफळ १६८ आझाद मैदानांहून अधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील समुद्री कांदळवनाच्या संवर्धनाकरिता सदर खारफुटी वन विभागाकडे जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वीच दिले आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने या संदर्भात मिळवलेल्या दस्तावेजानुसार २००५ रोजीच्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) अनुसार  पनवेल तालुक्यात २,५९५ हेक्टरवर खारफुटी अस्तित्वात असून ‘सिडको'कडून ५८२.५ हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्याशिवाय महसूल विभागाने निश्चित केलेले ४२८ हेक्टर क्षेत्र अजुनही वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. वाढत्या भारावर देखरेख ठेवण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई येथील खारफुटी संवर्धन युनिटने विभागीय वन अधिकारी मुंबई यांच्याकडे खारफुटीच्या संवर्धनावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त ३० कर्मचाऱ्यांची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळेच एकट्या पनवेल भागात जवळपास १,६८० हेक्टर खारफुटी अजुनही ‘सिडको'च्या ताब्यात आहे. रायगड जिल्ह्यात खारफुटीची जमीन हस्तांतरीत करण्यात होणाऱ्या दिरंगाईची तक्रार आम्ही सर्वच प्राधिकरणांकडे केली. मात्र, जवळपास सर्वच सरकारी एजन्सींनी नकार धोरण अवलंबले आहे, अशी माहिती ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.
नवी मुंबई प्रकल्प क्षेत्रातील खारफुटीची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा ‘सिडको'ने २४ मे रोजी संपूर्ण जगाला टि्‌वटद्वारे कळवली. त्यावर सदर क्षेत्र काही छोटे नाही. त्याची व्याप्ती मोठी असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.

दुसरीकडे सुमारे ७२१.२३ हेक्टरवर घनदाट खारफुटी पसरली आहे. ६७८.०३ हेक्टरवर विरळ आणि २१९.४३ हेक्टर दलदलीची आहे, अशी माहिती वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. ‘सिडको'ने आतापर्यंत ५८२.९३५ हेक्टर जागा ताब्यात दिली असून ३८२.०० हेक्टरसाठी एनओसी देण्यात आल्याचे विरेंद्र तिवारी यांनी ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ला माहिती देताना सांगितले.

 दरम्यान, ‘सिडको'ने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन डावलून ना-हरकत प्रमाणपत्र देणे अत्यंत विचित्र स्थिती आहे, असे वनशक्ती एनजीओचा सागरी विभाग, सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले. खारफुटीच्या नाशाला संपूर्ण गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने १८ सप्टेंबर २०१८ रोजी दिले होते. ‘बॉम्बे एन्व्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप (बीईएजी)'च्या याचिकेनंतर सागरी वनस्पती वन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले होते, याकडे नंदकुमार पवार यांनी लक्ष वेधले आहे.

वन विभागाच्या कागदपत्रांच्या हवाला नुसार गव्हाण क्षेत्रात सर्वाधिक ४२९ हेक्टर खारफुटी आहे, त्यापैकी ७१ हेक्टरहून अधिक जमीन ‘सिडको'ने हस्तांतरीत  केली आहे. त्यानंतर वाघिवली ३७१.१९ हेक्टर आहे, त्यापैकी ७१ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. ‘सिडको'ने कामोठे येथे १५८ हेक्टर आणि खारघर येथे १५२.४५ हेक्टर क्षेत्र ताब्यात ठेवले आहे. -बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्याची ‘हिंदु जनजागृती समिती'ची मागणी