कॉफीटेबल बुक मधून उलगडले समग्र रायगड

‘समग्र रायगड -पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण' या कॉफी टेबल बुकचे १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशन

नवी मुंबई ः जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘समग्र रायगड -पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण' या कॉफीटेबल बुकचे विभागीय माहिती कार्यालयामध्ये घ्ोण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे ‘समग्र रायगड -पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण' या कॉफी टेबल बुकचे १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशन झाले.

 रायगड जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्टस्‌, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन सदर कॉफीटेबल बुकमध्ये करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून सदर कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले असून  जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, मिडीया आर अँड डीचे दिलीप कवळी यांनी सदर कॉफीटेबल बुक तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

 कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी ‘समग्र रायगड -पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण' या कॉफी टेबल बुकचे विशेष कौतुक करीत जिल्हा माहती अधिकारी मनोज सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पालघरचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, ठाणे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे आणि कोकण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. गणेश मुळे यांनी यावेळी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१६०० हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरीत करण्यात ‘सिडको'कडून चालढकल