नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन तर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन 

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सुमारे १३७०० फेरीवाले असल्याचे नवी मुंबई महापालिका सांगत असली तरी केवळ बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेल्या  ७३२६ फेरीवाल्यांनाच महापालिका परवाना पहिल्या टप्प्यात देईल, अशी माहिती परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. ज. व्ही. पवार यांनी 'नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिली आहे. नवनियुक्त आयुक्त यांना आजच्या भेटीत आयुक्तांना सांगण्यात आले हया वेळी महाराष्ट्र फेरीवाला फेडरेशनच्या वतीने निवेदन देऊन नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील फेरीवाल्यांवर होणारा अन्यायाची माहिती देण्यात आली त्या वस्तू स्थिती माहीती घेऊन दिघा ते बेलापूर आठही विभाग अधिकारीना सूचना देण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी फेरीवाला शिष्टमंडळाला दिले.ह्या वेळी अनेक संघटना उपस्थित होते

घर हक्क संघर्ष समिती व महाराष्ट्र हाँकर्श फेडरेशन यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा.राजेश नार्वेकर साहेब यांची भेट घेवुन हाँकर्श व फेरीवाले संबंधीत समस्या मांडल्या व नवी मुंबई विकास मुंबई विकास आराखडा (D P )संबंधी नगर रचना संचालक मा.सोमनाथ केकाण साहेब यांच्या सोबत बैठक आयोजित करुन मुदतवाढ करावी या संबंधी मागणी केली त्यावेळी सौ.विनीताताई बाळेकुंद्री (सचिव, महाराष्ट्र हाँकर्श फेडरेशन) अँड.सुजीत निकाळजे (मुख्य सल्लागार, घर हक्क संघर्ष समिती )मा.कैलाश सरकटे (खजिनदार, घर हक्क संघर्ष समिती )सौ.शांता खोत (कामगार एकता युनियन )मा.बाळकृष्ण खोपडे (महाराष्ट्र हाँकर्स फेडरेशन) बौद्धाचार्य अशोक भद्रे व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कॉफीटेबल बुक मधून उलगडले समग्र रायगड