विकास आराखड्यावर हरकती, सूचना नोंदवण्यासाठी मुदत वाढ द्यावी

नवी मुंबई -:नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून   शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे,आणि यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत हरकती साठी  मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र सदर मुदत ही अल्प असून आराखड्यावर  हरकती आणि सूचना नोंदवण्याबाबत अधिकची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महानगर पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून १० ऑगस्ट रोजी  प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.आणि.त्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्याबाबत सुरुवातीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. तर सदर मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर मनपाने  २२ दिवसांची मुदत वाढवली होती. सदर विकास आराखडा आधी इंग्रजी मध्येच प्रसारित केला होता. त्यानंतर  ३० सप्टेंबर २०२२ नंतर मराठीत प्रसिद्ध झाला आहे आणि पालिकेने  याबाबत क्षेत्र सभा घेऊन विकास आराखड्या बद्दल पुरेशी जनजागृती केलेली नाही, त्याच बरोबर ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी सण असल्याने नागरिकांना सूचना हरकती नोंदवण्यामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे पालिकेच्या सदर प्रारूप विकास आराखड्यातील सुधारणे विषयी अधिकाधिक लोकसहभाग नोंदवण्याच्या अनुषंगाने सदर प्रारूप विकास आराखड्या बाबतीत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत किमान ६० दिवस अजून वाढवावी,  आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महानगर पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे. आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष CA निलेश पाटील, उपाध्यक्ष रवी मढवी, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सहसचिव विलास म्हात्रे उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार राष्ट्रपती पदकाने सन्मानित