‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ'तर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे ः बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील. तसेच ‘सिडको'च्या हद्दीत बंजारा समाजासाठी भूखंड देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ'च्या वतीने ठाणे मधील हायलँड मैदानातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, अन्न-औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गुलबर्गाचे खासदार डॉ. उमेश जाधव, ‘संघ'चे अध्यक्ष डॉ. शंकर पवार, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

निसर्गावर प्रेम करणारा आणि त्याची पुजा करणारा, कष्टकरी बंजारा समाज राज्याचे वैभव आहे. महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत आणि विकासात बंजारा समाजाचे योगदान आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे समाज मुख्य प्रवाहात येत आहे. आतापर्यंत शिक्षण आणि आरोग्य यापासून वंचित असलेला समाज यापुढील काळात त्यापासून वंचित राहणार नाही. या समाजाबद्दल माझ्या मनात नेहमीच आपुलकी आणि आत्मियतेची भावना राहिली आहे.बंजारा समाजाच्या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. पोहरा देवी तीर्थक्षेत्राचा विकासकामे सुरू करण्यात येतील. तांडा वस्ती विकासातून मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. सेवालाल महाराजा यांच्या जयंतीदिनी सुट्टी देण्यासंदर्भातही राज्य शासन विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

गेल्या तीन महिन्यात सर्वसामान्यांसाठीच शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गोरगरीब सामान्य नागरिकांची दिवाळी चांगली जावी यासाठी १०० रुपयात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे शासन सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे म्हणून जनता पाठिशी उभी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बंजारा भाषेतून संवाद साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाज सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारा आणि टॅटुचा जनक असल्याचे सांगितले. बंजारा समाजाकडे मोठी ज्ञान भांडार आहे. अशा या बंजारा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न देखील तातडीने सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करु. देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे राष्ट्रीय महामार्ग बनविले ते सर्व लमाण मार्गावर आहेत. या मार्गावरुनच पारंपरिक बंजारा समाज भ्रमण करत असे. सेवालाल महाराज यांच्या रुपाने समाजाला दिशा, विचार देणारे संत मिळाले. त्याच्यामुळे समाजाचे वैश्विक संघटन तयार झाले. संत रामराव महाराज यांचे आमच्यावर खूप प्रेम होते. पोहरादेवी विकासासाठी शंभर कोटी दिले. त्याचे काम आता वेगाने पूर्ण होईल. जागतिक दर्जाचे स्थान निर्माण होईल. पोहरा देवीच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी ‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ'चे अध्यक्ष शंकर पवार यांनी प्रास्ताविकात समाजाच्या मागण्या मांडल्या. ना. संजय राठोड, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विकास आराखड्यावर हरकती, सूचना नोंदवण्यासाठी मुदत वाढ द्यावी