खारफुटींचे संरक्षण ; वन अधिका-यांच्या निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमाचे त्यांनी कौतुक

मोठे बांध नेस्तनाभूत करुन ३००० खारफुटींचे संरक्षण
 

नवी मुंबई ः कामोठे आणि खारघर क्षेत्रामध्ये आंतरभरतीच्या जलप्रवाहाला खारफुटींपर्यंत येण्यात अडचण निर्माण करणारे मानवनिर्मिती बांध नष्ट करुन वन विभाग अधिकाऱ्यांनी अंदाजे ३,००० खारफुटींना वाचवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
नवी मुंबई खारफुटी जतन विभागाचे वन अधिकारी एस. एल. मंजारे यांनी आधी पोलीस आणि महसूल खात्याकडे तक्रार केलेल्या बांधांना अडथळे काढून टाकण्याच्या दृष्टीने नष्ट करण्यात आले आहेत. खारघर येथील ३६० मीटर लांबीचा बांध, तर कामोठे मधील १२० मीटर लांबीचा बांध नेस्तनाभूत करण्यात आले. १५ ऑवटाबर रोजी या दोन्ही स्थळांवरचे बांध हटवण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली, अशी माहिती मांजरे यांनी दिली आहे.

खारफुटी जतन विभागाच्या सदर तत्पर कृतीचे कौतुक करण्यासोबत नॅटकनेक्ट फाऊंडेशन ‘सिडको'ने वन विभागाला खारफुटींचे हस्तांतरण करण्यात झालेल्या उशीरामुळेच समुद्री वनस्पतींची अशा प्रकारे हानी होत असण्याची बाब ठळकपणे नमूद केली आहे. वन विभागाच्या नोंदींप्रमाणे खारघर आणी कामोठे मधील एकूण ८ वादग्रस्त हेक्टरांपैकी केवळ १.७४ हेक्टर्स खारफुटी जतन विभागाला सुपूर्द करण्यात आले असून उरलेले ६३०० खारफुटी असलेले अंदाजे ६.३ हेक्टर्स अजूनही ‘सिडको'च्या ताब्यात आहेत. बहुतांश खारफुटी एकतर वाळून गेल्या आहेत किंवा बांधामुळे साचलेल्या पाण्यामुळे कुजल्या आहेत. आंतरभरती प्रवाहाला पूर्वतत केल्यामुळे या वनस्पती पुन्हा वाढतील, अशी अपेक्षा आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. सदर प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांना आधीच सूचना देणाऱ्याॲड. प्रदीप पाटोळे यांनी मांजरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सदर तत्पर कृतीबद्दल अभिनंदन केले आहे. आम्ही खाफुटींना वाचवण्यासाठी आवाज उठवला होता. अखेरीस वन खात्याने वेळेवर कारवाई केली, असे कामोठे येथील ‘सिटिझन युनिटी फोरम'च्या रंजना साडोलिकर म्हणाल्या. या बांधांना नष्ट करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल असून काम जेवढे दिसते तेवढे सोपे नाही, असे ‘खारघर वेटलँड ॲन्ड हिल फोरम'चे नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले. त्यामुळे या वन अधिकाऱ्यांसाठी असलेला माझा आदर आणखीन वाढला आहे, असेही सिंग म्हणाले. असे ते म्हणाले आणि वन अधिका-यांच्या निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमाचे त्यांनी कौतुक केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मच्छीमार बांधवांचे प्रश्न मार्गी लावू - चंदू पाटील