वाहतूक कोंडीवर तोडगा ; कोपरखैरणे सेक्टर २२ आणि २३ मधील उजव्या रस्त्यावर नो पार्किंग झोन घोषित

नवी मुंबई -: कोपरखैरणे सेक्टर  २२,२३ ,१४,१५,आणि १६ आदी भागात रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. तसेच या भागात शाळा असल्याने स्कूल बस तसेच खाजगी वाहनांचा राबता असल्याने या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने कोपरखैरणे सेक्टर २२ आणि २३ मधील उजव्या रस्त्यावर नो पार्किंग झोन घोषित केले आहे.

नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे परिसर अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्याने वाहन संख्या ही झपाट्याने वाढली आहे. आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन या भागात आज रोज येथील वाहन चालकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे आणि हीच परिस्थिती सेक्टर १४ ते २३ दरम्यान असते. या शाळा, कॉलेज असल्याने स्कूल बस सहित खाजगी वाहने येत असतात. तर काही नागरिक आपली वाहंने रस्त्याच्याकडेला आपली वाहने उभी करतात. त्यामुळे या भागात रोज वाहतूक कोंडी होते. आणि यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी, सामाजिक संघटनांनी वारंवार मनपा आणि वाहतूक शाखेकडे पाठपुरावा केला आहे. याची दखल घेत नवी मुंबई वाहतूक शाखेचे पुरोषोत्तम कराड यांनी एक परिपत्रक जारी केले आहे.त्यात कोपरखैरणे सेक्टर २२ आणि २३ मधील गुरुद्वारा आणि ओमकार सोसायटी पर्यंत उजवी कडील रस्तावर १३ ऑक्टोबर पासून कायम स्वरुपी नो पार्किंग झोन घोषित केले आहे.त्यामुळे या रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहने.उभी राहिल्यास कारवाई केली जाईल.त्यामुळे सदर आदेशाने या भागातील वाहतूक कोंडी फुटणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान  व्यक्त केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारफुटींचे संरक्षण ; वन अधिका-यांच्या निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमाचे त्यांनी कौतुक