प्रशासनाने सिडको कर्मचाऱ्यांंच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

नवी मुंबई ः सिडको कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'ने सिडको भवनमध्ये द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सिडको प्रशासनाने लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. या द्वारसभेत ‘सिडको'तील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

‘सिडको'च्या अग्निशमन विभागांतील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाची थकीत रक्कम देण्यात यावी, सिडको भवन आणि रायगड भवन या ‘सिडको'च्या मुख्य इमारतीत बंद असलेली उपहारगृह लवकर सुरु करावे, कॅशलेस मेडीकल पॉलिसी रक्कमेत वाढ करावी आणि सिडको कर्मचाऱ्यांच्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांमधीलउत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करणे, तसेच सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या गट-२ पात्र कर्मचाऱ्यांना सदनिका, भूखंड देण्याबाबत लवकरच कार्यवाही सुरु करावी या मागणीसाठी १४ ऑवटोबर रोजी ऑक्टोबर रोजी ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील आणि सरचिटणीस जे. टी. पाटील यांच्या
नेतृत्वाखाली सिडको भवन येथे द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, सिडको कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यासाठी ‘एम्प्लॉईज युनियन'कडुन संचालक मंडळाकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याला संचालक मंडळाकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी सांगितले. अग्निशमन विभागातील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत ‘सिडको'च्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही जे.टी.पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांनी केले नवी मुंबई पालिकेच्या पर्यावरणशील कामांचे कौतुक