चंद्रगीते व कव्वालीवर आधारित चाँद-ए-महफिलचे आयोजन   

कोजागरी व ईद निमित्त नवी मुंबईत सांस्कृतिक जागर   

नवी मुंबई : कोजागरी पौर्णिमा व ईद-ए-मिलादचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे चंद्राची विविध रुपे उलगडणारी मराठी-हिंदी चित्रपटातील चंद्रगीतांसह कव्वालीवर आधारित चाँद-ए-महफिल या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन येत्या सोमवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाटÎगृहात सायंकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातील राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणा-या मान्यवरांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. 

चाँद-ए-महफिल या सांगितीक मैफीलीचे संगीत संयोजन अजय-मदन यांचे असून कार्यक्रमाचे निवेदन भिमसिंग करणार आहेत. तर गायिका संपदा गोस्वामी, युक्ता पाटील व गायक राणा चॅटर्जी, प्रशांत नासेरी, चैतन्य कुलकर्णी हे आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ही सांगितीक मैफील नवी मुंबईकरांसाठी विनामुल्य आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न नवी मुंबई प्रेस क्लबचा असतो. त्यामुळे नवी मुंबईकर रसिकांनी या कार्यक्रमास मोठÎा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे करण्यात आले आहे.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रशिक्षण न दिल्याने आज १० दिवस उलटले तरी देखील ती मशीन वापराविना पडून