प्रशिक्षण न दिल्याने आज १० दिवस उलटले तरी देखील ती मशीन वापराविना पडून

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाअभावी एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीन पडून 

नवी मुंबई -: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीची सुरक्षा अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून अधिक भक्कम करण्यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने मुख्यालयात एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीन बसवली असून तिचे उद्घाटन ६ ऑक्टोबर २०२२ रोजी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले. मात्र सदर मशीन हाताळण्याचे पूर्व प्रशिक्षण येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना नसल्याने ही मशीन वापराविना पडून आहे. 

स्वच्छ शहर सुंदर  शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे आणि या नावाच्या नाव लौकिकाला शोभेल अशी एक आगळ्या वेगळया स्वरुपाच्या आकर्षक वास्तुरचनेमुळे आयकॉनिक इमारत म्हणून मनपा मुखलायाची इमारत देशभरात नावाजली जाते. या ठिकाणी विविध कामांकरिता नागरिकांची तसेच अभ्यागतांची नेहमीच वर्दळ असते सदयस्थितीत रस्त्यावरील मुख्य प्रवेशव्दारावर नागरिकांची रजिस्टरला नोंदणी करुन मुख्यालयात प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी मानवीय पध्दतीने व्यक्तींची व त्याच्याकडील बॅग व इतर सामानांची तपासणी करण्यात येते. सदर पध्दतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे प्रस्तावित होते.त्या अनुषंगाने मुख्यालयात आणलेल्या सुरक्षा उपकरणामधील एक्स्‍ -रे बॅगेज स्कॅनिग मशीन महापालिका आयुक्त्‍ा राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते दिनांक ६ ऑक्टोबर रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. आणि सदर मशीन कार्यान्वित करण्याआधी येथील सुरक्षा रक्षकांना ती मशीन हाताळणीचे प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त होते. मात्र असे प्रशिक्षण न दिल्याने आज १० दिवस उलटले तरी देखील ती मशीन वापराविना पडून आहे.त्यामुळे सदर मशीन लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवउद्योजिकांचा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न