डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका तर्फे विनम्र अभिवादन

 वाचन संदेश प्रसारणातून वाचन प्रेरणा दिन साजरा

नवी मुंबई ः ‘मिसाईल मॅन' म्हणून सुपरिचित थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रतिमापुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त डॉ. श्रीराम पवार आणि अनंत जाधव यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सदर ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी पुस्तके प्रदर्शित करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यामधील काही भागाचे वाचन करण्यात आले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील समृध्द ग्रंथालयातही डॉ. एपीजे अब्दुल कलाम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची आकर्षक मांडणी करुन वाचन प्रेरणा दिनी अभिवादन करण्यात आले.  


वाचन प्रेरणा दिन नमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग मार्फत वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी घोषवाक्ये आणि संदेश असणाऱ्या प्रतिमांचे मुख्यालयातील डिजीटल बोर्डवर तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहातील डिजीटल बोर्डवर नागरिकांच्या माहितीसाठी प्रक्षेपण करण्यात आले. त्याअनुषंगाने वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चंद्रगीते व कव्वालीवर आधारित चाँद-ए-महफिलचे आयोजन