‘हरियाणा'च्या मंत्र्यांची गव्हाण, तरघर ग्रामपंचायतीला भेट

नवीन पनवेल ः हरियाणा राज्याचे ग्रामविकास-पंचायत मंत्री देवेंदर सिंग बबली यांनी अभ्यास दौऱ्यांतर्गत गव्हाण आणि तरघर ग्रामपंचायतीला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कॉमन सर्विस सेंटरची पाहणी केली. यावेळी ना. देवेंद्र बबली यांच्या हस्ते आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड लाभ्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यांनी तरघर ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र मार्फत दिल्या जाणाऱ्या दाखल्याबाबत माहिती घेतली. ग्रामपंचायत तरघर हद्दीतील मौजे मोहा येथे घनकचरा प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली.तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा-मोहा येथेही भेट दिली.

हरियाणा राज्याचे ग्रामविकास-पंचायत मंत्री देवेंदर सिंग बबली महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांतर्गत त्यांनी पनवेल तालुक्यातील गव्हाण आणि तरघर ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांकडून ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, वार्षिक उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्नातून कर किती मिळतो, त्या करामधून कोणकोणती विकास कामे करण्यात आली आहेत यांची माहिती घेतली. तसेच आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करुन त्यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी हरियाणा राज्याचे ग्रामविकास-पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल मलिक, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक अभियंता विनस नथालीया, अशिष शर्मा, राम प्रताप, वैभव देशपांडे, शिल्पा गणेगावकर, स्वप्नील चव्हाण, समशेर खान, संदिप साळुखे, पवनकुमार पांडे, संतकुमार स्वामी, ‘भाजपा'चे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, बीडीओ संजय भोये, ग्रामसेवक विजयकुमार राठोड, ग्रामसेविका पवित्रा हटले, जयेश म्हात्रे, एम. डी. पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका तर्फे विनम्र अभिवादन