शहर सुशोभिकरणावर भर देण्याचे महापालिका आयुवतांचे निर्देश

नवी मुंबई ः नवी मुंबई शहर स्वच्छतेवर बारकाईने लक्ष देतानाच सुशोभिकरणावरही व्यापक स्वरुपात भर दिला तर नागरिकांना आपण सर्वोत्तम शहरात राहतो, याचा आनंद वाटतो. सदर बाब शहर सुशोभिकरण मागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात १४ ऑवटोबर रोजी आयोजित विशेष बैठकीप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका अधिकारी- कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच उंचाविणारी कामगिरी केली असून राज्यातील इतर शहरांसाठी एक उच्चतम पातळी निश्चित करुन दिलेली आहे. यापुढील काळात सदर कामगिरी अधिक उंचवायची असून पोल वॉल्ट क्रीडा प्रकारात ज्याप्रमाणे सरजी बुबका याने प्रत्येक वर्षी स्वतःचेच विक्रम मोडले, त्याप्रमाणे आपणही निर्धार करुन आपले मानांकन उंचविण्यासाठी सज्ज व्हावे. त्यादृष्टीने आत्तापासूनच सुरुवात करावी, असे आयुवत नार्वेकर यांनी सूचित केले.

शहर स्वच्छतेवर भर देताना नागरिकांचे राहणीमान उंचाविणे आपला सुशोभिकरणामागील मुख्य हेतू आहे. याबाबतच्या कार्यवाहीत क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांची अत्यंत महत्वाची भूमिका असून या कामात वास्तूविशारद आणि सजावटकार यांचेही सहाय्य घ्यावे. यासंदर्भातील कार्यवाहीस आत्तापासूनच सुरुवात करावी असे निर्देश देत २५ डिसेंबर पर्यंत सुशोभिकरणाची कामे पूर्ण करावीत. याकरिता २५ डिसेंबर पासून आजपर्यंत उलट्या क्रमाने दिवस मोजून वेळेचे नियोजन करावे, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

उद्याने आणि मोकळ्या जागांचे सुशोभिकरण करण्यात यावे. यावेळी सुशोभिकरणविषयक विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचे छायाचित्रांसह सादरीकरण करण्यात आले असता यामध्ये आपली कल्पनाशक्ती मिसळून नवी मुंबई शहर अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले.


दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२'मध्ये देशातील तृतीय आणि राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून मानांकन मिळविल्यानंतर नागरिकांप्रमाणेच इतरांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यादृष्टीने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करण्याची गरज आहे. यामध्ये कचऱ्याचे तीन प्रकारे वर्गीकरण आणि स्वच्छता विषयक सर्वच बाबतीत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वच्छतेची आवड असणारे नवी मुंबईकर नागरिक या कामी १०० टक्के योगदान देतील, असा विश्वास आयुवत
राजेश नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढील काळात नवी मुंबई क्षेत्राचा विभाग कार्यालयनिहाय पाहणी दौरा करुन प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय आढावा घेणार आहे. शहर स्वच्छता आणि सुशोभिकरणातील कमकुवत बाजू असलेल्या रेल्वे स्टेशन्स आणि सायन-पनवेल हायवे या महापालिकेच्या अखत्यारित नसलेल्या २ बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने रेल्वे स्टेशनसाठी सिडको तसेच सायन-पनवेल मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने सहकार्य घेण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणार आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘हरियाणा'च्या मंत्र्यांची गव्हाण, तरघर ग्रामपंचायतीला भेट