सीमेवरील जवानांस लाडूंच्या बॉक्सच्यासह शुभेच्छा पत्रे जोडून त्यात छान संदेश

भारतीय विकास परिषद या संस्थेकडून जवानांस दिवाळी साठी  पौष्टीक लाडू भेट 
 
 खारघर   :   भारतीय सैनिकांबद्दल देशवासीयांच्या मनात नेहमीच आदर असतो. सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या जिवाची तमा न बाळगता सैनिक सीमेवर लढत असतात.  सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम व कृतज्ञतेपोटी दिवाळी भेट म्हणून पनवेल मधील भारतीय विकास परिषदेकडून  सीमेवरील सैनिकांना साडे सवीस हजार पौष्टिक लाडू पाठविले जाते. त्यात  लेह, लडाख येथील हवामानाचा अंदाज घेऊन काही काही दिवसापूर्वी  दोन  हजार लाडवांची पहिली खेप पाठवण्यात आली  आहे.  तीन वर्षापासून संस्थेचे हे उपक्रम सुरु आहे. 
 
      दिवाळी हा सण  संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहेया सणामध्ये लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन आपला आनंद वाटून घेतात. मात्र आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहारा देत असतात. त्यामुळे संपूर्ण देश सुखाने झोपू शकतो.  जवान म्हणजे देशाची  सुरक्षा कवच असून जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे. जवानांला  दिवाळी गोड भेट म्हणून  भारतीय विकास परिषदेने तीन वर्षांपूर्वी सीमेवर फराळ पाठविले जात आहे.  संस्थेच्या ज्योती कानेटकर म्हणाल्या   फराळ पाठवणे सहज, सोपे नाही. कारण फराळातील प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकाऊपणा, पदार्थ बनवताना वापरलेले साहित्य आणि  पदार्थ  पाठविण्यासाठी लष्कराचे नियम ,नियमावलीचे नियम पाळले जाते. जुलै महिन्यापासून लष्करा बरोबर पत्र व्यवहार करून परवानगी नंतर  उपक्रमाच्या कामाला सुरुवात केली जाते. काही दिवसापूर्वी लडाख,सियाचीन परिसरातील सैनिकांसाठी  दोन हजार पॅकेट पाठवले  असून  जमू, उदमपूर ,अखनूर ,तवांग भुज आदी पाकिस्तान सीमेवर असलेल्या भागातील जवानांना पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून दिवाळी पूर्वी जवानांच्या हाती पडेल त्यानुसार पाठवले जाते. 
 
   या दिवाळीला जवानांसाठी संस्थेकडून सवीस हजार पौष्टीक लाडू, तसेच 9,75 किलो चिवडा,  975 किलो सेव आणि 900 किलो चकली हे देखील सोबत पाठविण्यात येणार आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी  संस्थेचे पदाधिकारी  सुभेद भिडे , नितीन कानिटकर , शेखर बर्वे आणि पदमजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविले  जाते.शुद्ध, तेल,तूप,आणि ड्रायफूट मिळून तयार केलेला   पौष्टीक लाडू तयार करून लष्कराच्या गुणवत्ता यादीत परिपूर्ण उतरणारा, पौष्टिक लाडू तयार करून पाठविले जाते.या कामात संस्थेच्या  पदमजा कुलकर्णी आणि ज्योती कानिटकर सक्रिय सहभाग असतो.पाठविण्यात आलेले लाडू खूप छान असल्याची प्रतिक्रिया जवानांकडून मिळाल्यावर खूप आनंद होतो असे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.  
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची महापालिका आयुवतांकडून पाहणी