डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची महापालिका आयुवतांकडून पाहणी

स्मारकाची महती देश-परदेशात पोहोचण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकाने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सर्वच दृष्टीने आगळेवेगळे आणि उल्लेखनीय आहे. सदर स्मारकाला राज्यातीलच नव्हे तर देश-परदेशातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी यादृष्टीने स्मारकाच्या व्यापक प्रचार, प्रसिध्दीवर भर द्यावा. तसेच या स्मारकाची माहिती जगभरात पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


ऐरोली, सेवटर-१५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील सुविधांची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता संजय पाटील, प्रविण गाडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित दुर्मिळ छायाचित्र संग्रहालयातील पॅनल्सचे बारकाईने निरीक्षण करीत त्यावरील मजकूर वाचत काही सुधारणा आयुवत नार्वेकर यांनी सूचविल्या. सभागृह वापराप्रमाणेच पहिल्या मजल्यावरील ध्यानकेंद्रही लवकरात लवकर वापरात येईल यादृष्टीने तत्परतेने नियोजन करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही स्मारकापेक्षा ज्ञान हीच शक्ती असा विचार संदेश देणारे नवी मुंबई महापालिकेचे स्मारक सर्वच दृष्टीने अत्यंत वेगळे आहे. याचे वेगळेपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि या माध्यमातून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ लोकांना घ्ोता यावा यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्या यावा. याठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवून आणाव्यात आणि त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या मौलिक सूचनांची अंमलबजावणी करुन स्मारकाच्या लौकीकात भर घालण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाही करावी, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.

स्मारकातील सभागृहामध्ये यापूर्वी झालेली जागर व्याख्यानमाला तसेच विचारवेध शिर्षकांतर्गत मान्यवरांच्या व्याख्यानांमुळे स्मारक चर्चेत राहिले आहे. यापुढील काळात अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करावे. सभागृह विविध प्रकारच्या संस्कृती संवर्धक उपक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. स्मारकातील ग्रंथालयाची समृध्दता वाढविण्यासाठी आवश्यक ग्रंथसंपदा उपलब्ध करुन घेण्यासह बाबासाहेबांची संसदेतील भाषणेही ग्रंथालयातील ई-लायब्ररीमध्ये अभ्यासकांसाठी उपलब्ध करुन घेण्याकरिता कार्यवाही करावी.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम