व्यसनमुक्तीचा विचार आणि संदेश या किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम 

वाशी: दि.७ ऑक्टोबर रोजी वाशी येथील साईनाथ ज्युनिअर कॉलेजच्या एकाच वेळी दीड हजार विद्यार्थ्यांना अमली पदार्थांविषयी सावधगिरी व जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम चेतना फाउंडेशन, अन्वय प्रतिष्ठान तसेच स्त्रीमुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.  जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त 'मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता' या विषयावर या कार्यक्रमात ज्युनिअर कॉलेजच्या सर्व तुकड्यांमध्ये व्यसनमुक्तीचे समुपदेशकांद्वारे  दु.४.१५ ते ५.३० या वेळेत कलात्मक आणि नाट्यात्मक पद्धतीने व्यसनमुक्तीचा विचार आणि संदेश या किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचविण्यात आला. कविता नायर भाटिया डॉ.अजित मगदूम, नयन म्हात्रे,  मल्लिका सुधाकर , जीवन निकम, रश्मी कारले,अमित श्रीवास्तव, उर्मी सोनी, नंदिता बोस,रुचिरा शर्मा, अनिता पूंज, शबाना सय्यद, उपकार सिंग, सलीमा सय्यद, वासंती भगत, अवनी म्हात्रे,अरमान भाटिया, श्रीकला या समुपदेशकांनी प्रत्येक वर्गात सत्रे घेतली.. रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई गरिमाच्या निर्मला पांडे नुपूर चक्रवर्ती सीता मित्तल तसेच वाशी पोलीस ठाणे, साईनाथ कॉलेजच्या प्राचार्या बीना यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील २२०० हेक्टर खारफुटींचे होणार संरक्षण