‘संस्था'मध्ये शैक्षणिक दर्जा बाबत विशेष कामगिरी करणा-या शिक्षकांचा सन्मान

नवी मुंबई ः ‘रयत शिक्षण संस्था'तर्फे दरवर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातोश्री गंगुबाई पायगोंडा पाटील यांचे नावे ‘संस्था'मध्ये शैक्षणिक दर्जा बाबत विशेष कामगिरी करणारी आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, आदर्श गुरुकुल प्रमुख, आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रत्येक वर्षी दिले जातात. त्याअनुषंगाने ‘रयत शिक्षण संस्था'च्या रायगड विभागातून वाशी मधील मॉडर्न  स्कुल येथील मराठी विषयाच्या उपशिक्षिका मिनाक्षी किशोर मोरे यांना गंगुबाई पायगोंडा पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

‘रयत शिक्षण संस्था'च्या सातारा मधील मध्यवर्ती कार्यालय येथे संस्थेच्या वर्धापन दिनी ४ ऑक्टोबर रोजी आयोजित समारंभामध्ये कर्मवीरांचे नातू तथा ‘संस्था'चे चेअरमन अनिल पाटील यांचे शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिनाक्षी मोरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्रक आणि शाल प्रदान करण्यात आली. मिनाक्षी मोरे यांनी संस्थेतील शाळेत आजतागायत केलेले उत्कृष्ट अध्यापन, इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा प्रत्येक वर्षी १०० टवव्ोÀ निकाल, अध्यापक जीवनातील प्रामाणिकपणा आणि सेवाभाव, विद्यार्थी निष्ठा आणि संस्था निष्ठा, त्याचबरोबर सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान, त्यांनी विविध समारंभात केलेले उत्कृष्ट प्रभावी सूत्रसंचालन, कोरोना काळातील ऑनलाईन अध्यापन,  गुगल फॉर्म प्रश्नपत्रिका निर्मिती, रुग्णांना सहाय्य या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला.  सदर पुरस्काराबद्दल ‘संस्था'चे रायगड विभागीय चेअरमन बाळाराम पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, विभागीय अधिकारी आर.पी ठाकूर, उपविभागीय अधिकारी शहाजी फडतरे, मॉडर्न स्कुलच्या प्राचार्या सुमित्रा भोसले आणि सर्व रयत सेवक, विद्यार्थी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रात्रीचे आठ... अन्‌ मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ