पोलीस अंमलदार सुधाकर पाटील यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव

नवी मुंबई ः काही घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याचे प्रकार घडत असतात, तर काही कर्तव्यदक्ष पोलिसांच्या प्रामाणिकपणामुळे पोलीस दलाची मान उंचावण्याचे प्रकार देखील घडत असतात. अशाच प्रामाणिकपणाचा प्रत्यय नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक सुधाकर पाटील यांच्या कृतीमुळे आला आहे. तब्बल दीड लाख रुपये किंमतीचे रस्त्यावर पडलेले सोन्याचे दागिने पोलीस नाईक सुधाकर पाटील यांना सापडल्यानंतर त्यांनी स्वतः दागिन्यांच्या मालकाचा शोध घ्ोऊन त्यांना तेे परत करुन आपल्यातील प्रामाणिक पोलीस आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पाटील यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी देखील या प्रामाणिक पोलीस अंमलदाराला सन्मानित करुन त्यांचा गौरव केला.  

नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक सुधाकर पाटील ४ ऑवटोबर रोजी रात्री नवरात्री उत्सवाच्या बंदोबस्तासाठी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात होते. यावेळी रात्री सव्वा अकाराच्या सुमारास ते घरी जेवण्यासाठी मोटारसायकलवरुन जात असताना त्यांना कळंबोली बस डेपो समोरील रस्त्यावर एक पिशवी दिसली. सदर पिशवीवरुन गाड्या जात असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपली गाडी बाजुला घ्ोऊन सदर पिशवी उचलली. त्यानंतर काही वेळ त्यांनी तेथेच थांबून ये-जा करणाऱ्यांकडे सदर पिशवीबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सापडलेली पिशवी घ्ोऊन ते घरी गेल्यानंतर त्यांनी सदर पिशवीची पत्नी आणि मुलासमोर तपासणी केली. यावेळी त्यात २८ ग्रॅम वजनाचे दागिने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  

सदरचे दागिने नुकतेच बनवून घ्ोतल्याचे आणि त्यावर ज्वेलर्स दुकानाचे नाव असल्याचे सुधाकर पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे सापडलेले दागिने सकाळी मुळ मालकाला परत करण्याचा निश्चय करुन पाटील पुन्हा ड्युटीवर हजर झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी दागिन्यांच्या पिशवी वरील नावावरुन ज्वेलर्स दुकानाचा शोध घेऊन सदर दागिन्यांबाबत चौकशी केली. यावेळी ज्वेलर्स मालकाने प्रदीप पिल्ले या व्यवतीने त्यांच्या मुलीसाठी आणि भाचीसाठी त्यांच्या दुकानातून आदल्या रात्री दोन सोन्याच्या चेन खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर दागिने घेऊन जाताना, दागिन्यांची पिशवी रस्त्यात पडल्यामुळे ते गहाळ झाल्याचे तसेच रात्रभर पिल्ले यांनी सदर दागिन्यांचा शोध देखील घ्ोतला. मात्र, दागिन्यांची पिशवी न सापडल्याने पिल्ले यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात दागिने गहाळ झाल्याची तक्रार देखील दाखल केल्याचे ज्वेलर्स मालकाने पाटील यांना सांगितले.  

अखेर सदर दागिने प्रदीप पिल्ले यांचेच असल्याचे आणी गडबडीत त्यांच्याकडून सदर दागिन्यांची पिशवी गहाळ झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस नाईक सुधाकर पाटील यांनी कळंबोली पोलिसांच्या ताब्यात सदर दागिने दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदरचे दागिने प्रदिप पिल्ले आणि त्यांच्या पत्नीला कळंबोली पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले.

दरम्यान, पिल्ले यांचे दिड लाख रुपये किंमतीचे रस्त्यात सापडलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे मुळ मालकाला परत करणारे पोलीस नाईक सुधाकर पाटील यांचा सन्मान करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘संस्था'मध्ये शैक्षणिक दर्जा बाबत विशेष कामगिरी करणा-या शिक्षकांचा सन्मान