आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला होता. ७ ऑवटोबर रोजी आयुक्त नार्वेकर यांनी महापालिका मुख्यालयातील प्रत्येक विभागाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करुन मुख्यालयाची रचना आणि विभागांची व्यवस्था जाणून घेतली.

याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले तसेच प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृह, स्थायी समिती सभागृह आणि विशेष समिती सभागृह यांची पाहणी करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापौर दालन आणि इतर पदाधिकारी यांच्या दालनांचीही पाहणी केली. त्याचप्रमाणे विविध विभागप्रमुखांची दालने, अधिकाऱ्यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्था यांची पाहणी करीत विद्यमान बैठक व्यवस्थेत वाढ करण्याची आवश्यकता आहे काय? याबाबतची माहिती जाणून घेतली.

पाहणी दौऱ्यात मुख्यालयातील स्वच्छता समाधानकारक असल्याचे नमूद करीत स्वच्छता नियमीपणे करण्याची बाब असल्याने आपण स्वच्छ शहराचा बहुमान संपादन करतो. त्यावेळी आपली कार्यालये नियमीत स्वच्छ राहतील याची दक्षता घेण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी निर्देशित केले. मुख्यालयात येणारे विविध प्रकारचे साहित्य व्यवस्थितपणाला आणि नीटनेटकेपणाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेत योग्य ठिकाणी ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुख्यालयातील सीसीटिव्ही, वातानुकूलन यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था यावर नियंत्रण ठेवणाऱ्या बीएमएस कंट्रोल रुमला भेट देत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील यंत्रणेची बारकाईने माहिती जाणून घेतली. बेसमेंट मधील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी करत दक्षतेने कार्यरत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरएफआयडी कन्ट्रोल रुमला भेट देत आयुक्तांनी कचरा वाहतूक वाहनांची ट्रॅकींग सिस्टीम जाणून घ्ोतली. तसेच त्यांच्या डिजीटल रिपोर्टस्‌ची आणि व्यवस्थापनाची पाहणी केली. तळमजल्यावरील आवक-जावक कक्षाची पाहणी करीत तेथील पत्रव्यवहाराची ट्रॅकींग सिस्टींम अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही आयुवत नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.


नवी मुंबई महापालिका मुख्यालयप्रमाणेच मुख्यालयाबाहेरील महापालिका कार्यालयांचीही लवकरच पाहणी करणार आहे. विभागांच्या कार्यालयीन प्रणालीचा आणि प्रत्यक्ष कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. महापालिकेकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा विहीत वेळेत पूर्ण करुन गतीमान आणि लोकभिमुख प्रशासन राबवण्यावर आपला भर असणार आहे.   -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७ संचालकांच्या अपात्रतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत दिली स्थगिती