नवी मुंबईत ११९८ देवी मूर्ती, घटांचे भावपूर्ण विसर्जन

नवी मुंबई ः श्री गणेशोत्सव नंतर येणारा नवरात्रौत्सव नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. एकूण १७६ नवरात्रौत्सव मंडळांनी उत्सवाकरिता मंडपाची परवांनगी घेतली होती. यामधील अनेक नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी घटस्थापनेप्रमाणेच माता दुर्गेच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली होती.

विजयादशमीच्या नवरात्रौत्सव सांगता दिनी महापालिका क्षेत्रातील २२ मुख्य विसर्जन स्थळांवर महापालिकेमार्फत केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये ११९८ श्रीदुर्गामूर्ती आणि घटांचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये बेलापूर विभागात ४२ घरगुती आणि ६२ सार्वजनिक अशा एकूण १०४, नेरुळ विभागात १३४ घरगुती आणि २७ सार्वजनिक अशा एकूण १६१, वाशी विभागात २६६ घरगुती आणि १७ सार्वजनिक अशा एकूण ८३, तुर्भे विभागात ९१ घरगुती आणि ४० सार्वजनिक अशा एकूण १३१, कोपरखैरणे विभागात १६८ घरगुती आणि २९ सार्वजनिक अशा एकूण १९७, घणसोली विभागात १६२ घरगुती आणि ४९ सार्वजनिक अशा एकूण २११, ऐरोली विभागात ५० घरगुती आणि २४ सार्वजनिक अशा एकूण ७४ आणि दिघा विभागात २३० घरगुती आणि ७ सार्वजनिक अशा अशा एकूण २२६ श्री दुर्गामूर्ती तसेच घटांचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणेने केलेल्या नियोजनबध्द आखणीमध्ये नवरात्रौत्सवाचा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी