स्वच्छ शहरासाठी नवी मुंबई पुन्हा सज्ज

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सुरुवात

नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२' मध्ये नवी मुंबई शहराला राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ु यांच्या शुभहस्ते देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे. तसेच महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आगामी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला ‘निश्चय केला, नंबर पहिला' हेच ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून प्रारंभ करण्यात आला.


नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटरमध्ये आयोजित ‘प्रांरभ स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेची नवी दिशा या शिर्षकांतर्गत आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन करुन प्रतिकात्मक रितीने स्वच्छताज्योती उजळविण्यात आल्या.

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि संजय काकडे यांच्या हस्ते दैनंदिन स्वच्छतेत आपले बहुमोल योगदान देणाऱ्या प्रत्येक विभागातील २ अशा ८ पुरुष आणि ८ महिला स्वच्छताकर्मींचा प्रातिनिधिक स्वरुपात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'चे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ-१ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, क्रीडा- सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते शहराचा गौरव होणे प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नागरिकांच्या आणि स्वच्छताकर्मींच्या समर्पित कामामुळेच शहराचा गौरव झाला असून सदर मानांकन सर्व घटकांच्या एकत्रित सहभागाचा परिणाम असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात जसे देशात तृतीय मानांकन संपादन करणारे उत्तम काम झाले ते अधिक उंचाविण्याचा प्रयत्न यापुढील काळात नुकताच पदभार स्विकारलेले आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली केला जाईल, असा विश्वास अतिरिवत आयुवत सुजाता ढोेल यांनी यावेळी व्यक्त केला.


घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिल्लीमध्ये सदरपुरस्कार स्विकारल्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक शहरांचे अधिकारी, पदाधिकारी यांनी भेटून नवी मुंबईच्या स्वच्छताविषयक कामांची प्रशंसा करीत या शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यामधून देशातील विविध प्रांताच्या नागरिकांना नवी मुंबईच्या कामाबद्दल उत्सुकता असल्याचे दिसून येत असून त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सुरु होत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' मध्ये आपल्या स्वच्छतेचा स्तर उंचाविण्यासाठी एकदिलाने काम करुया, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.


‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये देशभरातील ४३६० शहरे सहभागी झाली होती. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त नवी मुंबई महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) वॉटरप्लस असे सर्वोच्च मानांकन मिळविणारेही महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. याशिवाय स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये सुप्रसिध्द संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या कर्णधार पदाखाली ‘नवी मुंबई इको क्नाईटस्‌ संघ' स्थापित करण्यात आला. त्या अंतर्गत विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. युथ वर्सेस गार्बेज या टॅगलाईननुसार ५३ हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने राबविण्यात आलेल्या भव्यतम उपक्रमास राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. त्याचप्रमाणे सदर उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस' मध्येही झाली.


दरम्यान, सदर पुरस्कार प्राप्तीच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला प्रारंभ होत असताना महापालिकेने अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या कलावंतांचे सादरीकरण उपस्थितांची दाद घेऊन गेले.


 देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान सर्वांची मान उंचाविणारा आहेच; शिवाय आपली जबाबदारी वाढविणारा आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'चा प्रारंभ होत असताना ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबंध्द राहुया. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा