ऑनलाईन फसवणुक रोखण्याबाबत जनजागृती

नवी मुंबई -: सध्या सोशल मीडियाचा जमाना असून झटपट व्यवहार करण्यासाठी डिजिटल व्यवहाराला अधिक पसंती देत आहेत. मात्र दुसरीकडे या ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली फसवणूक  होऊ नये यासाठी सावधानता कशी बाळगावी, तसेच पोलिसांची मदत कशी मिळवावी  यासाठी जनजागृती मित्र मंडळ नवरात्र उत्सव व आर्यवर्त फाउंडेशन यांच्या माध्यमातून जनजागृती पर अभियान म्हणून मोबाईल बँकिंग ऑनलाइन शॉपिंग आणि सायबर फसवणूक या विषयावर  सीवूड्स  नेरूळ येथे व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावर ऍड मंगल घरत व  एन आर आय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी जनजागृती मित्र मंडळाचे नाना पिसाळ प्रसाद मढवी भूषण चव्हाण रवींद्र महाडिक अमोल आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तालुक्यात हत्तीरोगाचे रुग्ण