कामोठे येथे कै. विश्वनाथ तांबोळी यांच्या स्मरणार्थ जागर आरोग्याचा!

कामोठे येथे जागर आरोग्याचा!

नवी मुंबई : कोरोनाच्या भयानक कालखंडात सर्वांनाच चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटले. सुदृढ शरीर आणि रोग प्रतिकारशक्ती या विषयी सर्वजण जागृत झाले. मात्र शरीरातील काही विकार तपासणीनंतरच कळून येतात. तपासण्यासाठी लागणाऱ्या पैशाअभावी किंवा वेळेअभावी पॅथॉलॉजी लॅब पर्यंत जाण्यास अनेक टाळाटाळ करतात. नवरात्र उत्सव कालावधीत मोठ्या संख्येने भाविक देवीच्या आराधनेसाठी आणि गरबासाठी एकत्र येतात ही बाब हेरून कामोठ्यातील छाबा फाउंडेशन ट्रस्टने नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सीमिरा हेल्थकेअर यांच्या सहकार्याने कै. विश्वनाथ तांबोळी यांच्या स्मरणार्थ  मोफत डायबिटीस आणि ब्लड प्रेशर तपासणी तसेच गरजूंसाठी मोफत ईसीजी शिबिर आयोजित केले.

कामोठ्यातील एकता मित्र मंडळ सेक्टर ३४,श्री हॅपी सिंग यांच्या युवा मित्र मंडळ सेक्टर ६ अ आयोजित नवरात्र उत्सव जवळ रोज संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत या शिबिराचे आयोजन केले आहे.

 छाबा फाउंडेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सचिन तांबोळी यांनी नवरात्र उत्सवात आयोजित करण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांसाठी कायमस्वरूपी ५०% सवलतीत औषधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीर केला आहे. 

कामोठ्यातील असंख्य रहिवाशांच्या प्रतिसादात सुरू असलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री, दामोदर चव्हाण,खजिनदार श्री शेखर शांताराम जगताप, सचिव सायली चव्हाण,रोहित अशोक हिरे,अॅड.कपिल शेट्ये,सुनील कुमार पांडा,प्रविण प्रकाश डोंगरे,सचिन साळुंखे,राज दुराई,राजू शेलार , शाहू भोसले,अर्चना शेलार,दिलीप शेलार,अजित सज्जन तांबे,राजेश पटेल,राज  गायकवाड,अनघा एस गावडे,राहुल जैस्वाल,प्रशांत  धुमाळ,राहुल जाधव, आकाश कोतकर, करण शिकलकर, लक्ष्मण चिखले, मोहन पोटे, भरत शेळके, सचिन डफळे, सागर नरसाळे, नम्रता  पवार, स्नेहल गायकवाड सदर, चंद्रकांत वापीलकर हे परिश्रम घेत आहे.

शिबिराबद्दल अधिक माहितीसाठी गरजूंनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा दामोदर चव्हाण ९६१९४२५२४४७,शेखर जगताप ९१६७०४८४५४,दिलीप शेलार ७६७८००४०००

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एका तोतया पोलिसाला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधीन