एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत बस दाखल 

मुंबईच्या धर्तीवर  नवी मुंबईतही धावणार डबल डेकर बस

नवी मुंबई -; आजवर मुंबई शहरात धावणाऱ्या डबल डेकर बस आता नवी मुंबई शहरात ही धावणार आहेत. नवी मुंबई परिवहन विभागाच्या ताफ्यात आता लवकरच  नवीन १० विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत. या विद्युत बसबाबत करार झाला असून त्याची निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना लवकरव डबल डेकर बसची सफर अनुभवता येईल.

मागील अनेक वर्ष नवी मुंबई महापालिका एनएमएमटीचे चाक तोट्यात रुतत चालले आहे. त्यामुळे परिवहन विभागलाअधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  यामध्ये  पर्यावरण पूरक अशा सीएनजी आणि विद्युत बसचा वापर वाढवून तसेच  बस आगारात वाणिज्य संकुल बांधून वापर करण्यात येणार आहे. आता सर्वच स्तरातून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सीएनजी किंवा विद्युत वाहनांना प्राधान्य दिले जात आहे . एनएमएमटीने देखील पर्यावरण पूरक, प्रदूषण टाळण्यासाठी डिझेल पेक्षा सीएनजी आणि विद्युत वाहनांना पसंती दिली आहे.  त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या फेम १ आणि फेम २  योजनेअंतर्गत  नवी मुंबई परिवहनाच्या ताफ्यात १८०बस घेण्यात आल्या आहेत. आता आणखीन ७५ बस घेण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ विद्युत बस आणि पर्यटकांकरिता दोन विद्युत डबल डेकर बस येत्या ३  महिन्यांत दाखल होणार आहेत.  तर १० विद्युत डबल डेकर बस ८ महिन्यांत दाखल होणार असून  नवी मुंबईकरांना लवकरच मुंबई प्रमाणे डबल डेकरची बसची सफर अनुभवता येणार आहे.

 नवी मुंबई परिवहन विभागाकडे एकूण ५६७ बस आहेत. त्यापैकी दररोज ४३०-४५० बस रस्त्यावर धावतात. यामध्ये डिझेल वरील  १९७ बस आहेत.  १८० विद्युत बस तर १०९ सीएनजीवर चालणाऱ्या बस रस्त्यावर धावत आहेत. एकंदरीत ५१% पर्यावरण पुरक तर ४९% डिझेल वरील बस सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात  ही टक्केवारी वाढणारा असुनअधिकधिक पर्यावरण पूरक बस रस्त्यावर दिसतील.

नवी मुंबई परिवहन विभागाने प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत बस खरेदी करण्यावर भर दिला आहे. येत्या काही दिवसात १५ विद्युत बस व डबल डेकर बस  परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून  त्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे. - योगेश कडुस्कर,  व्यवस्थापक, एन. एम .एम. टी.

 

 नवी मुंबई मध्येही धावणार डबल डेकर!

वाशी ः आजवर मुंबई शहरात धावणाऱ्या डबल डेकर बस आता नवी मुंबई शहरात देखील धावणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमच्या (एनएमएमटी) ताफ्यात आता लवकरच नवीन १० विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत. या विद्युत बसबाबत करार झाला असून, त्याची निविदा प्रकिया राबवण्यात आली आले. त्यामुळे नवी मुंबई मधील नागरिकांना लवकरच डबल डेकर एनएमएमटी बसची सफर अनुभवता येणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे (एनएमएमटी)चे चाक तोट्यात रुतत चालले आहे. त्यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाला अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक सीएनजी आणि विद्युत एनएमएमटी बसचा वापर वाढवण्यात आला असून, एनएमएमटी बस आगारात वाणिज्य संकुल बांधण्यात येत आहे. आता दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असल्याने सीएनजी किंवा विद्युत वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. ‘एनएमएमटी'ने देखील पर्यावरण पूरक, प्रदूषण टाळण्यासाठी डिझेल पेक्षा सीएनजी आणि विद्युत वाहनांना पसंती दिली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या फेम-१ आणि फेम-२ योजनेअंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या तापयात १८० बस घ्ोण्यात आल्या आहेत. आता आणखी ७५ बस घ्ोण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ विद्युत बस आणि पर्यटकांकरिता दोन विद्युत डबल डेकर बस येत्या ३ महिन्यांत दाखल होणार आहेत. तर १० विद्युत डबल डेकर बस येत्या ८ महिन्यांमध्ये दाखल होणार असून, नवी मुंबईकरांना लवकरच मुंबई मधील प्रवाशांप्रमाणे डबल डेकर बस मधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे.

आतापर्यंत ५१ % पर्यावरण पूरक बस रस्त्यावर

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या एकूण ५६७ बस आहेत. त्यापैकी दररोज ४३०-४५० बस रस्त्यावर धावतात. यामध्ये डिझेलवर धावणाऱ्या १९७ बस आहेत.  १८० विद्युत बस तर सीएनजीवर चालणाऱ्या १०९ एनएमएमटी बस रस्त्यावर धावत आहेत. एकंदरीत ५१ % पर्यावरण पूरक तर ४९ % डिझेलवर धावणाऱ्या बस सुरु आहेत. त्यामुळे भविष्यात सदर टक्केवारी वाढणार असून, अधिकाधिक पर्यावरण पूरक एनएमएमटी बस रस्त्यावर दिसणार आहेत.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम तर्फे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक असलेल्या विद्युत बस खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या काही दिवसात १५ विद्युत बस आणि डबल डेकर बस महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार असून, त्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे. - योगेश कडुस्कर, व्यवस्थापक - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ६८ तर डेंग्युचे १० रुग्ण