राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'तर्फे केंद्र-राज्य शासन विरोधात निदर्शने

नवी मुंबई ः महाराष्ट्राच्या भूमीवर होत असलेल्या वेदांत फॅक्सकॉन कंपनीचा तब्बल दोन लाख कोटी गुंतवणुकीचा आणि दीड लाख नोकऱ्या निर्माण करणारा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाने दुर्लक्षित करुन तो गुजरातच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दीड लाख कुटुंबांची रोजी-रोटी यावर अवलंबून होती. दीड लाख तरुणांना रोजगार यामुळे मिळणार होता. या सर्व तरुणांच्या आशा धुळीस मिळाल्या. सदर प्रकाराच्या निषेधार्थ तसेच ठाणे जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, वाढते खड्डे, निष्क्रिय
राज्यकर्ते, प्रशासन, मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावतानाच केलेल्या चुकीच्या वक्तव्या विरुध्द ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'चे सरचिटणीस तथा कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी ‘राष्ट्रवादी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अक्षय बोराडे, ‘राष्ट्रवादी कामगार सेल'चे जिल्हाध्यक्ष बाळू जरे, ‘विद्यार्थी काँग्रेस'चे जिल्हा सचिव ओंकार कदम, जिल्हा सरचिटणीस वैभव जाधव, ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रथम गोणते, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अक्षय सरगर, जिल्हा उपाध्यक्ष ओंकार कलंबे, सानपाडा-तालुका अध्यक्ष विराज ओसमल, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय घारे, गौरव मोर्या, शंतनू सिंघ तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रलंबित अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा यादृष्टीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा