स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'

स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्वाचा- आमदार प्रशांत ठाकूर
 
पनवेल: स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्वाचा आहे, त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनाचा प्रसार करा”, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (मंगळवार, दि. २७) येथे केले.
 
         देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमे आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्मातील स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल' शीर्षकाखाली दोन दिवसीय वस्तूंचे प्रदर्शन शहरातील गोखले सभागृहात करण्यात आले असून या शिबिराचे उदघाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
 
    यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी  नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, विकास घरत, माजी नगरसेविका नगरसेविका दर्शना भोईर,रुचिता लोंढे, नीता माळी, वृषाली वाघमारे, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, महिला मोर्चा शहर सरचिटणीस सपना पाटील, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, नीता मंजुळे, मयुरी उनटकर, आदिती मराठे, सोनाली पवार, सपना ठाकूर, अनिता रणदिवे, अंजली इनामदार, सोनाली सावंत, जेष्ठ नागरिक सेल शहर संयोजक उपेंद्र मराठे, रघुनाथ बहिरा, महेश सरदेसाई, चंद्रकांत मंजुळे, अप्पा शिंदे, अक्षय सिंग, शिवाजी भगत, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
    देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत 'सेवात्मक', 'रचनात्मक', 'व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व' अशा विविध सेवाकार्य असलेल्या 'सेवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल' शीर्षकाखाली दोन दिवसीय वस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून याचा लाभ कार्यकर्ते आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने स्थानिक वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादने खरेदी करावे. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. स्थानिक वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनाचा प्रसार करा”, असे आवाहन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 
 
 
 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पीएफआय संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर धाडी धरपकड सुरू