पीएफआय संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर धाडी धरपकड सुरू

नेरूळ आणि पनवेल मधून पीएफआयचे दोन कार्यकर्ते अटकेत

नवी मुंबई  : देशविधातक कृत्यांना मदत करण्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने गत आठवड्यापासून पीएफआय या संघटनेच्या  देशभरातील  कार्यालयावर धाडी टाकून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी देखील मंगळवारी नेरूळ आणि पनवेल भागातुन पीएफआयच्या  दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

गत २२ सप्टेंबर रोजी देश भरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी नवी मुंबईतील नेरूळ दारावे गावातील पी एफ ओच्या कार्यालयात देखील धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी एन आय ए च्या पथकाने पी एफ आयचा अध्यक्ष आसिफ शेख याची तब्बल 7 तास चौकशी करून त्याला सोडून दिले होते. त्यावेळी एन आय ए च्या पथकाने पनवेल येथील कार्यलयावर देखील धाड टाकुन एकाला ताब्यात घेतले होते. या कारवाई दरम्यान एन आय ए च्या पथकाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, भित्ती पत्रके व फलक जप्त केले होते.

त्यानंतर मंगळवारी एन आर आय पोलिसांनी नेरुळ सेक्टर -50 मधून अब्दुल रेहमान अब्दुल रौफ शेख (38) या कार्यकर्त्याला अटक केली. तर पनवेल शहर पोलिसांनी बावन्न बंगला परिसरात राहणाऱ्या अब्दुल रहीम याकूब सय्यद (46) याला अटक केली आहे. या दोघांवर सी आर पी सी (151)3 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजा गावची जागृत ग्रामदेवता द्रोणागिरी माता