महापालिका कर्मचाऱ्यांना ५० हजार तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका राज्यात सधन महापालिका म्हणून गणली जाते. महापालिकेची भरभराट कर्मचाऱ्यांच्या परिश्रमावर झालेली आहे. आता दिवाळी सण एक महिन्यावर आलेला आहे. सानुग्रह अनुदान तथा बोनसकरिता महापाालिकेच्या अंदाजपत्रकात याआधीच भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दिवाळी निमित्त यंदा महापालिका प्रशासनाने आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना तसेच परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे अर्थकारण बिघडून गेले आहे. कोरोना कालावधीत महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी स्वतःसह परिवाराच्या जीविताची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महागाई वेगाने वाढत असल्याने घर चालविणे देखील महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अग्निदिव्य बनले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त महापालिका आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपये तर ठोक मानधनावरील तसेच परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील चालक-वाहक आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहिर करावा, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी आयुवत अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास सूट