वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?

नवी मुंबई : एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांमधून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा सोडली जात आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा २२ सप्टेंबर रोजी आला आहे. यावेळी कोपरखैरणे, महापे, बोनकोडे, कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त हवा आल्याने नागरिकांना मळमळ होण्यासह श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे वायू प्रदूषण करणाऱ्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नवी मुंबईतील रबाले, महापे आणि पावणे औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या रासायनिक कारखान्यातून सातत्याने रासायनिक द्रव्य मिश्रित पाणी सोडले जात आहे. तसेच रात्री प्रदूषित वायू सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात वायू प्रदूषण होऊन नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. नुकतेच कोरोना महामारीतून नागरिक बाहेर पडले आहेत. मात्र, या दरम्यान कोरोना झालेल्या रुग्णांच्या फुपफुसावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात प्रदुषित हवा सोडण्याचे सत्र सुरु झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारात कोपरखैरणे, महापे, बोनकोडे, कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त हवा सोडण्यात आली होती. सदर प्रदूषित वायू सोडल्याने परिसरात दुर्घधी येत होती. तसेच सर्वत्र धुक्याचे लोळ पसरले होते. या वायूमुळे परिसरातील नागरिकांना मळमळ होणे, डोके दुखणे आणि छाती भरणे असा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे वारंवार दुर्गंधीयुक्त वायू सोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी कोपरखैरणे मधील सामाजिक कार्यकर्ते नदीम अली मापारी यांनी महारष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचऱ्यातून साकारली ६० फुट ‘पलेमिंगो' रेखाकृती