आ.मंदाताई म्हात्रे यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी

नवी मुंबई ः दिवाळी पहाट निमित्त वाशी मिनी सिशोर येथे मार्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्याशी  ‘बेलापूर'च्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी २३ ऑवटोबर रोजी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून भेटीगाठी घेण्यात आल्या नसल्याने सदर ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी ‘भाजपा अनुसूचित जाती मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, अब्दुल हमीद खान (पाशाभाई), कल्पना छत्रे, प्रमिला खडसे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला उपास्थित होत्या. यावेळी सर्व नागरिकांना मिठाई देऊन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशी मिनी सिशोर येथे ज्येष्ठांना भेटणे जमले नाही. दोन वर्षांनी येथे आल्यावर खूप छान वाटत आहे. स्थानिक नागरिकांच्या जॉगिंग ट्रॅकच्या अडचणी तसेच विविध समस्या आहेत. सदर समस्या लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा'च्या चित्ररथाला तरुणाईचा प्रतिसाद