नरेंद्र पाटील यांचा ‘माथाडी युनियन'तर्फे सत्कार

नवी मुंबई ः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती निमित्त २५ सप्टेंबर, २०२२ रोजी एपीएमसी येथे आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्ष पदी माजी आमदार तथा ‘माथाडी युनियन'चे नेते नरेंद्र पाटील यांची नेमणूक केल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाच्या कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन १७ ऑक्टोबर रोजी नरेंद्र पाटील यांच्या सदर नेमणुकीचा शासन निर्णय काढण्यात आला.

‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र पाटील यांचे ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या मस्जिद बंदर येथील मुख्य कार्यालयात ‘युनियन'चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.  राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'ची पुनर्रचना करुन सन २०१८ मध्ये नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष पदी नेमणूक केली होती. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला. सदर नियुवतीनंतर नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध तालुके आणि जिल्ह्यांचा दौरा करुन जवळपास ५० हजार मराठा युवकांना उद्योजक केले. नरेंद्र पाटील यांच्या सदर कार्याची पोहोच म्हणून त्यांची पुन्हा ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्ष पदी नियुवती करण्यात आली आहे.

दरम्यान, अण्णासाहेबांनी ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ सुरु केली, त्या कार्यालयात त्यांना पुष्पहार अर्पण करुन आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नरेंद्र पाटील आज १९ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोरील कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळून जास्तीत जास्त मराठा युवकांना या महामंडळाच्या योजनेचा लाभ आणि उद्योजक करण्याचा प्रयत्न करीन. -नरेंद्र पाटील, नवनियुवत अध्यक्ष-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र.


 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोजागरी पौर्णिमा व ईद-ए-मिलादचे औचित्य साधून चाँद-ए-महफिल हा सांगितीक कार्यक्रम नवी मुंबईत उत्साहात संपन्न