अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन'तर्फे ई-श्रम कार्ड, रेनकोटचे वाटप

 

नवी मुंबई ः ‘अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन'च्या वतीने केंद्र सरकरचे ई-श्रम नोंदणी अभियान ३ ऑवटोबर रोजी एपीएमसी मधील माथाडी भवन येथे राबविण्यात आले. यावेळी नोंदणी केलेल्या ई-श्रम कार्डचे वाटप आणि पालावाला महिला कामगारांना रेनकोटचे वाटप तसेच महिला मेळावा संपन्न झाला.

सदर मेळाव्यास एपीएमसी दाणाबंदर मार्केट आवार आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या पालावाला महिला उपस्थित होत्या.एपीएमसी दाणाबंदर मार्केट आणि इतर मार्केटमध्ये कष्टाची कामे करणाऱ्या स्त्री-पुरुष महिला कामगारांची केंद्र शासनाच्या ई- श्रम कार्ड नोंदणीमध्ये नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी सुरेखा म्हात्रे, आशा तळेकर, किरण वर्गा, निलम देवी, सुनिल बन्शी शिरसाठ, अनिता सावंत, संगिता मागाडे, भिमाबाई भोईर, बुधीया आचार्य, अंजून सिंग, सिमा चौरासिया यांना ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच सुरेखा म्हात्रे, गंगा कांबळे, वैशाली गायकवाड, वसुनिता काटकर, मंदा पाटणकर, इंदूबाई पवार, सुजाता शिर्के, सुमन लांडगे, अनिता सावंत, वैभवी कदम, मासफ सैय्यद, लक्ष्मी गंगापुरी, माया पडांगळे आदि पालावाला महिला कामगारांना मान्यवरांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'ला महिलांचा प्रतिसाद